karla leni

कार्ल्याची लेणी ही खास समजली जातात - कारागिरी आणि लोकांचे योगदान अशा दोन्ही अर्थाने. इ. स. च्या पहिल्या शतकात यांचे बांधकाम सुरू झाले असावे. येथील खांब प्रेक्षणीय आहेत, अष्टकोनी खांबांवर वरच्या भागात कोरलेली शिल्पे आहेत. शिल्पांमध्ये हत्ती, पुरूष आणि स्त्रिया आहेत. जोडप्यांची कोरीव शिल्पे बाह्य भागात आहेत, आणि एक खास असा सिंहांचा स्तंभही आहे. आणि रचना ही एकाच मोठ्या योजनेचा भाग असल्याप्रमाणे आहे (नंतर आधीच्या बांधकामाला न शोभणारी अशी भर घातलेली नाही). सर्व थरातील लोकांनी दान देऊन ही लेणी बनवली आहेत असे आढळून आले आहे. पण लेण्यांचे काम हे भूतपाल नावाच्या व्यापार्‍याने करवून आणवले. कार्ल्याचे जुने नाव वेळूरक असे असावे. धेनूककट आणि सोपारा, तसेच वेजमती या गावांमधील लोकांनी, (धेनूककट येथील "यवनांनी") या कामाला पैशाचे पाठबळ (दान) दिले असेही दगडांवर कोरलेले मिळते. ऋशभदत्त (उसवदत्त) आणि वशिष्ठीपुत्र पुळुमवी ( सातवाहन राजा, उच्चार माहिती नाही) ही जमीन वेळूरक संघाला दिली असे उल्लेख आहेत.
या लेण्यांची आतली स्थिती अधिक चांगली आहे. आतील भागात इतर लेण्यांत जसे पावसाने नुकसान झाले आहे तसे इथे दिसत नाही याचे कारण थोडा आडोसा व्हरांड्यासारख्या भागाने तयार झाला आहे. आतील लाकडी छतही जवळजवळ २००० वर्षांनंतरही बर्‍यापैकी सुस्थितीत आहे.
लेण्यांच्या बाहेरील बाजूस एकविरा देवीचे देऊळ आहे.
कार्ला लेणी कडे जाण्याचा मार्ग

कार्ला लेणी प्रवेशद्वारातून दिसणारे दृष्य
उजव्या हाताला दिसणारे एकवीरा देवीचे मंदिर




कार्ला लेणी : एकविरा आईच्या डोंगरावरच्या या लेण्यांचा आनंद घ्यायचा म्हणजे लोणावळ्याला फिरणं आलंच. कर्जतला उतरून ट्रेनने लोणावळा गाठू शकता किंवा बाय रोड गाडी करूनही संपूर्ण ग्रुप येथे जाऊ शकतो. तिथलं वातावरण एन्जॉय करता येऊ शकते.

कार्ला लेणी:पुण्यापासून अंदाजे ४० किलोमीटरवर वर कार्ल्याची प्रसिध्द लेणी आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकातील आहेत. ही बौद्ध लेणी म्हणजे स्थापत्यशास्त्राचे एक अप्रतिम उदाहरण आहे.
Karla Caves near Lonavala: (कार्ला लेणी)

The Karla caves at Lonavala are one of the most famous and ancient man-made caves in the world and a must see if you are on a trip to Lonavala and Khandala. The Karla caves date back to around 100 AD, and the beautiful stone and rock architecture in these caves will leave you spell bound and wondering as to how it was done.

It is believed that Buddhist monks used to build such rock-cut caves, as a resting point where fellow travellers could rest and could spend time in meditation.

Lion pillars greet you at the entrance of the Karla caves at Lonavala, and the entrance gate is shaped like a 'Peepal' leaf (The Peepal tree is known for its longevity) and the main hall inside (Chaitya) is large and spacious and full of pillars on which huge elephant forms and human forms carved. There are also many other such magnificently carved Chaitya (halls) at the Lonavala Karla caves, apart from the main hall.

At the entrance to the Karla caves is the temple of goddess 'Ekvira Aai', whom Koli fishermen worship.


Aai Ekvira Temple (Koli Temple) near Karla Caves - Lonavala (एकवीरा आई)


The 'Ekvira Aai' temple, also known as the Koli temple, is sacred to the Koli fishermen community who worship the goddess Ekvira Maata. This temple is located outside the main Chaitya (entrance hall) of the Karla caves at Lonavala.

The Koli fishermen travel over to the hills at Lonavala, to this Mata Ekvira Aai temple in large numbers during special occassions such as the Navaratri festival and during the month of Chaitra, as per the Hindu calender.

Remember the lyrics of the famous Marathi song 'Ekvira Aai to Dongarawari', Nazar hai tujhi Kolyawari'?
These words mean 'Ekvira Aai atop the mountain, you are watching over the fishermen folk below. Now you know which mountain and which temple the Ekvira Aai song is refering too. Its this mountain at Lonavala and the goddess is situated atop the mountain near the Karla caves.


जायचे कसे?

रेल्वेनेः पुणे मुंबई रेल्वे लाईनवर ‘मळवली’ स्टेशनवरून ७, लोणावळे स्टेशनवरून १२.मोटारनेः पुणे ५६, लोणावळा १०, मुंबई ११४.

काय पाहायचे?

कार्ले येथे सर्वात मोठी चैत्य लेणी आहेत. (ख्रिस्तपूर्व सुमारे सन १६०) ४० मी. लांब १५ मी. रूंद व १६ मी. उंच असा एक हॉल असून एकवीरा देवीचे मंदिर आहे. लेण्यांच्या प्रवेशद्वारापाशी तीन सिंहाचा एक स्तंभ. सुमारे ४० फूट उंचीचा हा एकसंध पाषाण स्तंभ महारथी अग्निमित्रकाने खोदवून घेतला. इतर स्तंभावर हत्ती, स्त्री-पुरुषांच्या जोड्या अत्यंत प्रमाणशीर आहेत. या महाचैत्याला सागवानी फासळ्यांचे छत आहे. ते २ हजार वर्षे शाबूत आहे हे आश्चर्यकारक आहे.

मळवली स्टेशनपासून २ कि.मी. वरील 
भाज्याची लेणीही कार्ले लेण्यांइतकीच प्राचीन आहेत. एकूण २२ लेणी असून त्यातील १२ वी सर्वात सुंदर आहे. तसेच काही शिल्प व अलंकारीक चित्रेही पाहण्यासारखी आहेत. धबधब्या-शेजारची सूर्य गुंफा यात ऐरावतारूढ इंद्र चवऱ्या ढाळणाऱ्या २ पत्नींसह रथारूढ सूर्य, राक्षसांना तुडवणारे ४ घोडे अप्रतिम. बेगडेवाडीस रेल्वेस्टेशनजवळ शेलारवाडी (घोरवडेश्वर) लेणी प्रेक्षणीय.

कामशेत (मुंबई-पुणे मार्गे) रेल्वे स्टेशनवर उतरून तेथून मोटारने १५ कि.मी. बेडसे गावाला व तेथून (३.५ कि.मी.) गुहांकडे चालत जावे लागते. इ.स. पूर्व पहिल्या शतकातील या लेणी समुहांत अष्टकोनी खांबावरील कोरीव काम अप्रतिम. चैत्यगृहातील कलते खांब चैत्याकार खिडक्या विस्तीर्ण हर्मिका अर्धवर्तुळाकार छताला सागवानी फासळ्या प्रवेशद्वाराशी दगडी पडदायामुळे ही लेणी वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. जवळच निवासी खोल्यांसह विहार ही आहे. परिसर वनश्रीने रमणीय आहे.
जवळची ठिकाणेः लोणावळा १०, पवना डॅम  बेडसे येथून १०, लोहगड / विसापूर गड

निवासः हॉलिडे कँप कार्ला व लोणावळा येथे लॉजेस
लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पहा. ही वास्तविक बौद्धांची, तेथल्या त्या ओ-या, ते दिवाणखाने, ते स्तूप, सा-या बौद्धांच्या स्वाध्यायश्रमाच्या जागा. तेथें बाहेर एक देवी प्रगट झाली. तिचे नांव एकवीरा. हिला वेहेरची देवी असेहि म्हणतात. ही म्हणजे पांडवांची बहीण. हिच्यासाठीं भीमानें एका रात्रीत हीं लेणीं कोरून काढली. हिचा दुसरा इतिहास काय, तर ही रेणुका, परशुरामाची आई. स्वतः परशुरामच जेथे अमानुष क्रौर्याचा पुतळा व पुरस्कर्ता तेथे त्याची ही एकवीरा मातोश्री बोकडाच्या कंदुरीशिवाय भक्ताला कशी प्रसन्न होणार? चैत्री पौर्णिमेची कार्ल्याची जत्रा मोठी दांडगी. हजारो मराठे, कोळी, बरेचसे कायस्थ प्रभू वगैरे भटेतर लोक यावेळी तेथे नवस फेडायला जाता. नवसापायीं शेळ्यामेंढ्यांचे कळपच्या कळप फडशा पाडून हीं कार्ला लेणी रक्तांत न्हाऊन निघतात. जो प्रकार कार्ला येथें, तोच प्रकार इतर सर्व लेण्यांत. जेथे असले बोकडखाऊ देवदेवींचे देऊळ नाहीं, तेथे प्लेझर पार्टीसाठी जाणारे लोक सुद्धां कंदुरी केल्याशिवाय परत येत नाहीत. अहिंसावादी बौद्ध लेण्यांत अखंड सुरू असलेले हे `देवळी’ प्रकार म्हणजे बौद्ध द्वेषाची परमावधीच नव्हे काय? सारांश, भिक्षुकशाहीचा प्रतिस्पर्धी विषयीचा द्वेष पिढ्यानपिढ्या टिकणारा असतो, हे विसरता कामा नये.. ( माझ्या वाचनात आलेला हा लेख आहे , फक्त वाचना पुरतीच मर्यादित असावा )
पुण्याच्या पश्चिमेस मुंबई रस्त्यावर ही लेणी आहेत. मळवली रेल्वेस्टेशनपासून उत्तरेकडे ४ कि. मी. अंतरावर कार्ले लेणी आहे. पुणे लोणावळा लोकल गाडया तसेच एस. टी. बसेसचीही सोय आहे. सुमारे २००० वर्षापूर्वीची भव्य लेणी हे काल्याचे वैशिष्टये येथे मोठया संख्येत चैत्य गुंफांचे दर्शन होते. डोंगरावरच एकवीरा देवीचे देऊळ आहे. कार्ला येथे विश्रामधाम तसेच तीन कि. मी. अंतरावर मळवली येथे सरकारी पर्यटक निवास आहे. मळवली स्थानकावरुन दक्षिणेकडे सुमारे २ कि. मी. भाजे गावापाशी भाजे लेणी आहे. या ठिकाणी गुंफा व लेणी आहेत. तेथे बौध्द विहार व प्रार्थनास्थळे आहेत. कामशेत रेल्वेस्थानकापासून दक्षिणेकडे सुमारे १५ कि. मी. अतरावर भेडसा लेणी आहेत. शेवटपर्यत मोटारचा पक्का रस्ता आहे. लेणी सुमारे 2००० वर्षापूर्वीची असून अतिशय सुंदर आहेत. वरील तिन्ही लेण्यांचा भाग पर्यटकांचे आकर्षण आहे











कार्ल्याच्या एकवीरा देवीचे दर्शन घेण्यास जाताना देवीजवळ मागितलेला नवस आनंदाने वाजत गाजत फेडावयास निघालेले एक ग्रुप 

 कुलदेवता एकवीरा

कुलदेवता एकवीरा

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image
एकवीरा देवीचे हे जागृत शक्तिपीठ असून देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे केवळ नवरात्रातच नव्हे तर वर्षभर देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी येथे भाविकांची गर्दी असते. डोंगराला लागून देवीचे मंदिर असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी डोंगरालाच फेरी मारावी लागते.
कार्ला गडावरील एकवीरा देवी आगरी, कोळी, कायस्थ, प्रभू, भंडारी, कासार, दैवज्ञ ब्राह्मण, सोनार समाजाची कुलदेवता म्हणून ओळखली जाते. कार्ला डोंगरावरील एका अखंड शिळेतून देवी प्रकट झाल्याचे सांगण्यात येते. मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळानजीक आणि मळवली रेल्वे स्थानकापासून जवळच कार्ला लेणी आहेत.
याच लेण्यांच्या परिसरात लाल मातीच्या डोंगरावर पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधल्याची आख्यायिका आहे. एकवीरा देवीचे हे जागृत शक्तिपीठ असून देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे केवळ नवरात्रातच नव्हे तर वर्षभर देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी येथे भाविकांची गर्दी असते. डोंगराला लागून देवीचे मंदिर असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी डोंगरालाच फेरी मारावी लागते. मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे. चैत्र आणि अश्विन महिन्यात देवीची मोठी यात्रा भरते.
डोंगराखाली तीन मैलांवर असणा-यादेवघर या लहानशा गावात देवीचे माहेर असून तिथे एकवीरेचा भाऊ काळभैरव राहतो, असे मानले जाते. तिथेही चैत्र शुद्ध षष्ठीला यात्रा भरते. चैत्र महिन्यात शुद्ध सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत जत्रा भरते. डोंगरावर पूर्वी पशुबळी देण्याची प्रथा होती. आई एकवीरा म्हणजे पार्वतीचे रूप असल्याने ती आदिशक्ती, आदिमाया असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. तिच्या कृपेने भक्तांची मनोरथे पूर्ण होतात. सुख, संपत्ती, यश, कीर्ती, आरोग्य लाभते अशी तिची भाविकांमध्ये महती आहे. रेणुका, यल्लमा, अक्काअज्वैचार (याचाच अपभ्रंश म्हणजे एकवीरा) अशी या देवीची विविध नावे आहेत. नवरात्रात कार्ला गडावर एकवीरेच्या दर्शनाला भक्तांची गर्दी उसळली होती.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

nageshwar mandir satara

"HINDAVI SWARAJYA SUVARN SINHASAN PUNARSANSTHAPANA NYAS"