सह्याद्रिचे शिलेदार, मोहिम सहावी स्थळ. किल्ले राजगड .. गडांचा राजा, राजांचा गड... दिनांक. ३१ जानेवारी व १ फ़ेब्रुवारी २०१५.

सह्याद्रिचे शिलेदार, मोहिम सहावी

स्थळ. किल्ले राजगड .. गडांचा राजा, राजांचा गड...

दिनांक. ३१ जानेवारी व १ फ़ेब्रुवारी २०१५.

मोलाचा सहभाग - सुमित आहेर, अविनाश निंबाळकर, शंकर बुर्डे, कुणाल आमले, समित वाणी, सागर लाड, सागर नलावडे, चिंतामणी मुसळे, प्रणय पडवळकर, भरत डेंगळे, चंद्रशेखर आहेर, वैभव माने, योगेश उबाळे, दिनेश चित्तलवार, गौरी आहेर, किर्ती बुर्डे, माधुरी आहेर, दिपाली चव्हाण, आणि कु. साई आहेर, अंश बुर्डे, ओमकार .

प्रंचड उत्साहा मध्ये राजगड मोहिम पार पडली, प्रचंड उत्साह.. खरंच, प्रत्येक शिलेदारा ला हा अनुभव आला कि राजगड मध्ये एक विलक्षणीय शक्ती आहे जी सर्वांना एक वेगळीच प्रेरणा देत असते. माझ्या प्रत्येक शिलेदाराचे मनापासुन आभार, मित्रहो असेच सोबत राहु आणि आपल्या या शिरोमणी भुषणावह गडांन्ना मोकळा श्वास देत राहु.

राजगड, खरंच कोणाला किती माहिती आहे राजगडा बद्दल ? राजगड ज्या गडावर महाराजांनी त्यांच्या आयुष्यामधील २४ वर्षे घालवली, जो राजगड १६४७ ते १६७१ महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होता. ज्या राजगडाने महाराजांचे सर्व दिवस पाहिले, सुख दुख: चांगले वाईट सर्व दिवस. ज्या राजगडाच्या कुशीमध्ये महाराज कित्येक वेळा एकट्या मध्ये रडले असतील, ज्या राजगडाने महाराजांच्या पाठीवर मायेचा हात फ़िरवला तोच, तोच राजगड. महाराजांच्या हयाती मध्ये काय बिशाद असेल कोणाची कि राजगडावर दुकृत्य करेल. चौकी पहारे, माणासांची वर्दळ, गडावर येणारे रडवेले चेहरे जाताना हसत जात असतील महाराजांच्या न्यायबद्ध प्रवृत्ती मुळे. एक शिरोमणी भुषण राजगड.. मरनोण्मुख झालेल्या महाराष्ट्राला ज्या शिवबाने एक नविन जन्म दिला, ज्या महाराष्ट्राच्या मातीला म्लेंच्छांच्या गुलामगीरी मधुन शिवबा ने मुक्त केले त्याच, होय त्याच शिवबाच्या या घराची अवस्था पाहुन खरा मराठा रडल्याशिवाय राहाणार नाही. महारांजाचा प्राण जरी रायगडावर गेला तरी त्यांचा आत्मा आजही राजगडावरच कुठेतरी आहे, जो रोज रडतोय त्यांच्या या गडाची अवस्था पाहुन.

असो, राजगडा बद्दल कितीही लिहीले तरी कमीच पडेल.. तर राजगड मोहिम आम्ही पार पाडली, राजगडावर पहिला पाय ठेवला तेव्हाच आमचे स्वागत केले एक दारुच्या बाटलीने, काय नालायकी आहे ? लाजा सोडल्या आहेत , आरे लाज वाटुद्या, हरामखोरांनो जीव जळतो रे हे पाहुन.. ज्या राजाने तुमच्या आमच्या भविष्यासाठी सोनं पेरुन ठेवल त्याच्या घरा मध्ये हे असले धंदे करता, थोडीतरी शरम बाळगा.. खरंतर आठ दिवसांपुर्विच कुठेतरी वाचना मध्ये आले होते की कोणत्या तरी अमुक संघटने ने राजगड स्वच्छता केली होती त्यामुळे आमचा समज असा होता कि कदाचीत राजगडावर आपल्याला काही साफ़ करण्याची गरज लागणार नाहि पण हा समज साफ़ खोटा ठरला कारण तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही कि आम्ही राजगडावर आम्ही ७२ गारबेज पिशव्या भरुन कचरा काढलाय.. ७२ मोठ्या पिशव्या, विचार करा कि किती श्वास गुदमरला असेल त्या गडाचा , रस्त्यावर कचराकुंडी दिसली तर आपण नाकाला रुमाल लावतो मग विचार करा त्या राजगडाचा जीव नसेल गुदमरला ? ? ? तर आम्हाला खरचं हा प्रश्न पडला कि खरच त्या संघटने ने काय स्वच्छ केले गडावर ? वरवरची साफ़सफ़ाई व फ़ोटो काढुन फेसबुक वर टाकण्यासाठी असली साफसफाई करु नका, आणी कोणाला जर हा प्रश्न विचारायचा असेल कि मग तुम्ही काय करता तर एक मोहीम सहभागी व्हा आमच्या सोबत, तुम्हाला उत्तर मिळेल प्रश्नाचे..
दोन दिवसांच्या मोहिमेमध्ये पहिल्या दिवशी पाली दरवाजा, पाली दरवाज्याकडिल कडा, तलाव, पद्मावती माची परिसर, पद्मावती तलाव, पद्मावती मंदिरा समोरील दोन पिण्याच्या पाण्याचे टाके, चोर दरवाजा, चोर दरवाज्या कडिल कडा अत्यंत अवघड असा कडा, ज्यांनी राजगड ट्रेक केला आहे त्यांना माहित असेल चोर दरवाजा कडिल कडा किती भयानक आहे ते, तर तो कडा दोर लाउन आमचे शिलेदार शंकर बुर्डे यांनी खाली उतरुन स्वच्छ करण्यात आला. चोर दरवाजा कडिल साफसफाई चालु असताना जर्मनी देशातिल एक मित्र अलेक्झांडर ने थांबुन तो थरार अनुभवला व मनभरुन सगळ्या शिलेदारांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या, आलेक्झांडर ची एक प्रतिक्रिया कि" धिस इज युअर हिस्टरी, युअर ट्राडिशन, यु हव टु मेनटेन इट. (हि तुमची संस्कृती आहे, तुम्हालाच ती संभाळायला जपायला हवी)" मनातुन विचार आला कि आहो अलेक्झांडर साहेब जे तुम्हाला बाहेरील देशातील लोकांना कळतय ते आमच्या या ----- लोकांना कुठे वळतय. ----- च्या जागेवर हवा तो शब्द भरा, काय करणार ना सोशल नेटवर्कींग वर लिहीताना सो कोल्ड रिस्ट्रिक्शन्स येतात, कारण पु.लं. च्या म्हणन्या नुसार " पाठी प्रमाणे मनाला ही बाक आलेले लोक अश्लिल अश्लिल म्हणुन ओरडु लागतात." पहिल्याच दिवशी ४२ पिशव्या भरल्या होत्या, असंख्य प्लास्टिक च्या बाटल्या, दारुच्या बाटल्या आणि अनमोल असाहा खजिना.. खरच.. काय बोलावे, विकृती आहे सगळी.

संध्याकाळी बालेकिल्ल्यावर जाउन जिथे राजे राहात होते त्या जागेची पुजा केली. बालेकिल्ल्याचा महादरवाजा वर फुलांचे तोरण बांधले व पणत्या लाउन त्याची देखील पुजा केली, मन प्रचंड भरुन आले.. अविस्मरणीय असा सोहळा कधीच न विसरण्यात येणारा. त्याच रात्री पद्मावती देवीच्या मंदिरा मध्ये देवीची मुर्ती धुवुन , तीला चंदन तिलक लाउन, हार व पुजा केली. ५०० पणत्यांचा दिपोत्सव साजरा करुन देवीची आरती केली, इतके प्रसन्न वातावरण आणि काही क्षण असे भासत होते कि तिथे साक्षात तुळजाभवानी अवतरली आहे, मी त्याचा व्हिडीओ युट्युब वर अपलोड केला आहे, तो वेळ काढुन नक्की पहावा हि नम्र विनंती. त्याची लिंक खाली शेअर केली आहे, तो पुर्ण पहावा शेवट पर्यंत म्हणजे खरंच तुम्हाला अनुभव येईल जे मी बोलतोय.. त्याच रात्री बरेचसे पर्यटक गडावर राहण्यासाठी गडावर होते तर त्या सर्वांना जमा करुन एक छोटेसे निवेदन केले गडांवर कचरा न करण्या संदर्भामध्ये.

दुसर्या दिवशी सकाळची सुरुवात मंदिराच्या समोरच असणारी राणिसाहेब सईबाइसाहेब यांच्या समाधीची पुजा करुन करण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहण व पुढिल मोहिमेची सुरुवात. सकाळीच सुवेळा माची व संजिवनी माची कडे सुद्धा स्वच्छता करण्यात आली. बालेकिल्ल्या कडिल भाग दोर लाउन स्वच्छ करण्यात आला, बालेकिल्ल्या कडे सुद्धा प्रचंड कचरा काढला. संपुर्ण मोहिमे नंतर लक्षात आलं कि ७२ पिशव्या भरुन कचरा होता हा , तर असा प्रश्न पडला कि हा खाली कसा न्यायचा, तर गडावर खुप फ़िरायला आलेल्या लोकांना आवाहन केले कि आम्हाला मदत करा हे खाली उतरवण्यासाठी तर बरयाच लोकांनी सहभाग घेतला. शेवटी निघता निघता मंदिरा समोर खाली पडलेली साधारण २५० किलो वजनाची तोफ पण उचलुन ठेवली.

मोहिमेच्या शेवटी एक खुप अभिमानास्पद प्रतीक्रीया आली.. गडाचे गडकरी श्री. रसाळ मामा यांनी सांगितलेला अनुभव त्यांचाच शब्दा मध्ये - "मी साधारण २२ वर्षे या गडावर आहे पण २२ वर्षामध्ये पहिला असा शनिवार होता कि गडावर लोकांचा धिंगाणा नव्हता, दारुच्या बाटल्यांचा वास नव्हता, मोठमोठ्याने गाणी लाउन नंगानाच नव्हता, किंवा असे कि लोकांनी बाटल्या आणल्या पण तुमच्या, सह्याद्रिच्या शिलेदारांच्या गडावरच्या असणारया उपस्थीती मुळे त्या बाटली चे झाकण उघडायची हिम्मत झाली नसेल." मित्रहो.. उर भरुन आले अभिमानाने..

तर असा प्रचंड उत्साहा मध्ये हि मोहीम पार पडली.

युट्युब लिंक : https://www.youtube.com/watch?v=IL94g9LwmTs&feature=youtu.be

सर्व शिलेदारांचे मनापासुन आभार व हार्दिक अभिनंदन व पुढिल शिवकार्यास शुभेच्छा.

आपला एक मित्र व शिलेदार
सुमित आहेर.

तुम्हाला सुद्धा जर या शिवकार्या मध्ये सहभागी व्हायचे असल्यास आमच्याशी संपर्क साधावा.

सुमित आहेर (पुणे विभाग)
मोबा. नं - +९१ ९८९०९४९४९३

अविनाश निंबाळकर (मुंबई विभाग)
मोबा. नं - +९१ ९००४८६८२०२





















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

karla leni

nageshwar mandir satara

"HINDAVI SWARAJYA SUVARN SINHASAN PUNARSANSTHAPANA NYAS"