karla leni
कार्ल्याची लेणी ही खास समजली जातात - कारागिरी आणि लोकांचे योगदान अशा दोन्ही अर्थाने. इ. स. च्या पहिल्या शतकात यांचे बांधकाम सुरू झाले असावे. येथील खांब प्रेक्षणीय आहेत, अष्टकोनी खांबांवर वरच्या भागात कोरलेली शिल्पे आहेत. शिल्पांमध्ये हत्ती, पुरूष आणि स्त्रिया आहेत. जोडप्यांची कोरीव शिल्पे बाह्य भागात आहेत, आणि एक खास असा सिंहांचा स्तंभही आहे. आणि रचना ही एकाच मोठ्या योजनेचा भाग असल्याप्रमाणे आहे (नंतर आधीच्या बांधकामाला न शोभणारी अशी भर घातलेली नाही). सर्व थरातील लोकांनी दान देऊन ही लेणी बनवली आहेत असे आढळून आले आहे. पण लेण्यांचे काम हे भूतपाल नावाच्या व्यापार्याने करवून आणवले. कार्ल्याचे जुने नाव वेळूरक असे असावे. धेनूककट आणि सोपारा, तसेच वेजमती या गावांमधील लोकांनी, (धेनूककट येथील "यवनांनी") या कामाला पैशाचे पाठबळ (दान) दिले असेही दगडांवर कोरलेले मिळते. ऋशभदत्त (उसवदत्त) आणि वशिष्ठीपुत्र पुळुमवी ( सातवाहन राजा, उच्चार माहिती नाही) ही जमीन वेळूरक संघाला दिली असे उल्लेख आहेत. या लेण्यांची आतली स्थिती अधिक चांगली आहे. आतील भागात इतर लेण्यांत...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा