शांततेचा भडका
https://sanatanprabhat.org/marathi/146073.html ‘शांतते’चा भडका उडणारच ! April 30, 2018 गेली काही वर्षे अणूयुद्धाच्या शक्यता वर्तवल्या जात असतांना या पंधरवड्यात जगभरात अचानक शांततेचे वारे वाहू लागले आहेत. एकमेकांहून वरचढ भयावह अण्वस्त्रांची निर्मिती करून महायुद्ध घडवण्यासाठी फुरफुरणारे बाहू आता एकमेकांना हस्तांदोलन करण्यासाठी पुढे आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रनिर्मितीच्या कार्यक्रमाने अवघे जग भयभीत झाले होते. मध्यंतरी उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले होते. आता अचानक उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी येत्या मे मासापासून अण्वस्त्र चाचणी केंद्रे बंद करण्याचा निर्णय घोषित केला आहे. या निर्णयाने एकेकाळी उत्तर कोरियाला शह देणारी अमेरिकाही सुखावली आहे. एकमेकांचे सख्खे शेजारी असलेले उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात तर अण्वस्त्र चाचण्यांवरूनच ३६ चा आकडा होता. आता मात्र दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांचे पंतप्रधान एकमेकांच्या भेटीगाठी घेतांना दिसत आहेत. चीन-भारत ही एरव्ही युद्धाच्या उंबरठ्यावरील राष्ट्रे असूनही गत आठवड्यात