PEB - VIKATGAD NEAR MATHERAN

सह्याद्रीचे शिलेदार संघ मोहिम एकोणिसावी किल्ले विकटगड उर्फ़ पेबगड
स्थळ : किल्ले विकटगड, उर्फ़ पेबगड दिनांक: ०९.०८.२०१५
मोलाचा सहभाग : सुमित आहेर, कुणाल आमले, समित वाणी, सागर नलावडे, चिंतामणी मुसळे, भानुदास साबळे, संतोष थिटे, परिश्रुत करंजीकर, देवदत्त मुळ्ये, स्वप्निल गाडगे, मलिक, अनिल माने, भरत डेंगळे, चंद्रशेखर आहेर, प्रथमेश धुमाळ, माधुरी आहेर, किर्तीताई बुर्डे, अमृता होनकळसे, राजश्रीताई पवार, दिपाली चव्हाण, नेहा जगताप, अमृता तेलंग, राजश्री खानविलकर, तेजश्री खानविलकर
विकटगड उर्फ़ पेबगड ...
पनवेलच्या इशान्येला, नेरळ पासुन पश्चीमेला साधारण ३ कि.मी वर पेबचा किल्ला आहे. या गडाचे मुळ नाव "पेब" हे गडा खाली असणार्या पेबी देवी वरुन पडले असावे असा अंदाज आहे. गडावरिल गुहांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला असा संदर्भ पेब च्या किल्ल्या बाबत आढळतो. किल्ल्यावर आजमिती ला प्राचीन कालीन गुहा बघावयास मिळतात, तसेच किल्ल्यावर गुरुदेव दत्तांच्या पादुकांचे मंदीर आहे. तसेच पुढे गेल्यावर महादेवाचे मंदीर सुद्धा बघावयास मिळते, मंदीरामध्ये महादेवाच्या पिंडीच्या वरच्या बाजुल पेबीदेवी ची प्रतिमा आहे. गडावर तुटलेली तटबंदीचे अवशेष व बुरुज पहावयास मिळतात.
किल्ल्यावर जाण्यास तिन वाटा आहेत. एक माथेरान कडुन, दुसरी नेरळ कडुन व तिसरी पनवेल कडुन. माथेरान कडुन जाणारी वाट जास्ती सोयिस्कर आहे.
दिनांक ९ ऑगस्ट २०१५ रोजी सह्याद्रीचे शिलेदार संघा मार्फ़त किल्ल्यावर स्वच्छता तसेच गडसवंर्धन मोहिम पार पाडण्यात आली. मोहिमे अंतर्गत किल्ल्यावर स्वच्छता करण्यात आली व गडावरील प्लॅस्टिक चे साम्राज्य कमी करण्यात आले. गुहांची स्वच्छता करण्यात आली. किल्ल्यावर असणार्या गुहेमध्ये छत्रपतींची एकमेव मुर्ती ची पुजा करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. गडावर एक गोष्ट जाणवली कि कोणतेही हॉटेल नसल्यामुळे गडावर प्लॅस्टीक कचरा जास्त प्रमाणात अढळला नाही.
एक खुप वाईट घटना काल गडावर घडता घडता त्या मुलिचे दैव बलवत्तर म्हणुनच फ़क्त ते घडल नाही. किल्ल्यावर असणार्या पादुका मंदिराच्या पश्चीमेला काही मुले खाली पाय सोडुन बसले होते. त्या मधील एका मुलीचा सेल्फ़ी फोटो काढताना तोल गेला व ती अंदाजे २०० ते २५० फ़ुट खोल दरीच्या बाजुला पडली, नशिब बलवत्तर म्हणुन ती तिथेच अडकली व वाचली. सह्याद्रीच्या शिलेदारांनी शक्यतो सर्व मदत केली परंतु सर्वांना एक आवाहन कि आपण जेव्हा किल्ल्यावर जातो तेव्हा किल्ल्याची माहीती घ्या, किल्ल्या चे सौंदर्य अनुभवा व निसर्गा ची मैत्री करा पण त्याचाशी खेळु नका, कधीकधी अतीउत्साह जिवघेणा ठरु शकतो.
मोहिमे मध्ये सहभाग घेतलेल्या सर्व शिलेदारांचे मन:पुर्वक आभार तसेच अभिनंदन.. नविन शिलेदारांनी सुद्धा प्रंचंड उत्साह दाखवला तसेच जो विश्वास सह्याद्रीचे शिलेदार संघा वर दाखवला त्या बद्दल त्यांचे देखील मन:पुर्वक धन्यवाद तसेच आभार. पुढील मोहिम आपल्या सर्वांची वाट बघत आहे.
आपले आभारी,
सह्याद्रीचे शिलेदार संघ, महाराष्ट्र.
संपर्क
सुमित आहेर (पुणे विभाग) +९१ ९८९०९४९४९३
अविनाश निंबाळकर (मुंबई विभाग) +९१ ९००४८६८२०२









































































टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

karla leni

nageshwar mandir satara

"HINDAVI SWARAJYA SUVARN SINHASAN PUNARSANSTHAPANA NYAS"