मोहिमेचे श्लोक

⛳श्री तुळजाभवानी प्रसन्न

मोहीम २००५

श्रीवसंतगड तें श्रीसप्तर्षीगड मार्गें श्रीसज्जनगड

मोहीमेचे श्लोक👇

शत्रू असंख्य असले तरी ना डरावे।
एकेक गाठुनी रणी टिचूनी वधावे।।
मागे कधी न फिरणे शिवपाईकांनी।
आज्ञापिले रणी आम्हां शिवभूपतींनी ।।१।।

गिळण्यास प्राण उठला जरीं ही कृतांत।
संभाजी धर्म जगले जळत्या रणांत।।
सूर्याहुनी ही अति दाहक धर्मभक्ती।
स्फुरण्यास नित्य धरुया शिवपुत्र चित्तीं।।२।।

भीतीपुढें झुकु नका पथ ताठ चाला।
जय जय भवानी शिवबा रणमंत्र बोला।।
विजयी रणांत करण्या भगव्या ध्वजास।
हृदयांत साठवूं सदा शिवभूपतींस।।३।।

⛳श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान⛳

https://www.facebook.com/shri.shivpratishtanofficial/

टिप्पण्या