।। ⛳श्री तुळजाभवानी प्रसन्न।।

भारतमाता जगतजननी पावना धेनुमाता।
गंगा गीता तशीच तुळजा जन्मदा वेदमाता।।
साऱ्या माता जरी हि दिसल्या वेगळाल्या रुपांत।
हिन्दुत्वाचा रस प्रसवतो सात हि माऊलीत।।

गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरूजी

अर्थ:- जन्म देणे (प्रसवणे) व लाडाने वाढवून बालकाला परीपूर्ण बनवणे हा ध्यास प्रत्येक माऊलीचा असतो. तसेच जगातील हिंदुत हिंदुत्व म्हणून जे  काही शिल्लक असेल त्याचा जन्म जर कुठे होत असेल तर तो ह्या सात मातांच्या पोटी ....

कोण आहेत त्या माता ...?

१) जगत्जननी भारत माता :- जगात हिंदूना कुठली पुण्यभू असेल ती म्हणजे भारत माता 

३) गोमाता :- भारतीय ऋषी प्रणित कृषी संस्कृती कोणी राखली असेल तर ती गोमाता

४) गंगा माता :- श्री शंकराच्या जटेतून वाहणारी व आपल्या निर्मळ पाण्याने सर्व ताप हरणारी गंगामाता हिच आपआपल्या प्रदेशात नदी रुपाने वाहत असुन सदैव प्रवाही राहून समृद्ध करते.

५) गीता माता :- जीवनाच्या युद्धात कसे लढावे ह्याचे शिक्षण देणारी गीता माता

६) तुळजा माता (श्री जगदंबा) :- आपल्या कुळाची स्वामीनी श्री जगदंबा; जी सदैव सीमोल्लंघन करण्यास सिद्ध राहायची प्रेरणा देते.

७) जन्ममाता :- ज्या मातेच्या गर्भातून आपण जन्म घेतो ती; आपली प्रथम गुरु. 

२) वेदमाता :- जगातील सर्व ज्ञान "तत्व"(सुत्र) रूपाने ज्यात समाविष्ठ आहे ती वेदमाता.

ह्या सर्व माता वर वर पाहता जरी भिन्न दिसत असल्या तरी तत्वरुपाने एकच आहेत. ह्या सप्त माताच हिंदू धर्माच्या सनातन विचारधारेला पुन्हा पुन्हा जन्म देतच असतात  ....

आपल्या पुढच्या पिढ्या ह्याच पावन संस्कृतीत जन्माव्यात म्हणूनच ह्यांचे जतन करण्याची जवाबदारी आपल्या सर्वांची आहे.

⛳श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान⛳



https://www.facebook.com/shri.shivpratishtanofficial/

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

karla leni

nageshwar mandir satara

"HINDAVI SWARAJYA SUVARN SINHASAN PUNARSANSTHAPANA NYAS"