मोहीम म्हणजे काय असते हे मोहीम केल्या शिवाय समजत नाही , काही भाग्यवंत असतात त्यांना सहजच लाभ मिळतो मोहिमेत सहभाग घेण्याचा..
पण काही माझ्या सारखे अभागी होते ज्यांना शिवाजी संभाजी किल्ले , सह्याद्रि, इतिहास तर आवडतो पटतो वाचावयास पाहिजे असं वाटतं पण मनात चित्तात हृदयात ठासून भरून रहावेत असं वाटत नाही कारण मार्ग दाखवणारा कदाचित कोणी भेटत नसावा , भेटलाच तरी तिथं पर्यंत घेऊन जाणारा असावा , हे पुस्तक वाच ते पुस्तक वाच लय भारी आहे ते वाचू नको एवढं काय खास नाही ...हे अशी पुस्तक वाचून इतिहास शिवाजी संभाजी सह्याद्रि किल्ले समजत नाहीत त्याकरीता त्या वातावरणातच जावे लागते...श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ची गडकोट मोहीम असते हे फेसबुक वरून समजले , 2014 मध्ये गुरुजींच्या व्याख्यानाला सुद्धा गेलो ....पण म्हणतात ना मनाची पुर्ण तयारी असल्या शिवाय मूळ उद्धेश प्राप्त करून घेता येत नाही..
वर्ष 2014- 2015 असेच गेले ..
मनात असंख्य प्रश्न निर्माण व्हायचे ...एकाच ठिकाणी इतक्या लाखोंच्या संख्येत इतके लोक कसे बरे जमा होत असतील , कशे चालत असतील , कुठं झोपत असतील , पहाटेच्या वेळी शौचविधी इतक्या गर्दीत कुठं जात असतील , ऐकून तर माहीत होते पहाटे 4 ते 5 वाजताच सुर्य नमस्कार जोर बैठका श्लोक घेतले जातात इतक्या सकाळी थंडीत मी ऊठुन हे सर्व करीन का ?
इतके चार पाच दिवस शिदोरी बांधून न्यायची , काय घेऊन जायचं कसं चालत असतील इतका बोजा पाठीवर घेऊन , आणि ते काठी हातात कशाला पाहिजे , सूर्य नमस्कार , जोर बैठक कशाला पाहिजे , थंड पाण्याने अंघोळच घरी का करावी , सैनिक कसे जगत असतील , मोहिमेत पत्ते , बुद्धीबळपट , मुखसारंगी , गॉगल , उशी , अंगठी घड्याळ लॉकेट , ह्याट , पनामा टोपी भडक रंगाचे रंगीबेरंगी कपडे , इंग्रजी भाषेत छापलेले बनियन हे सर्व चांगिभंगी का चालत नाही ?
हे मोहिमेत गेल्याशिवाय कळत नाही ।
मोहीम सुरुवाती पासून शेवट पर्यंतच का करावी ...उगीचच दिखावा म्हणून शेवटचे दोन दिवस का येऊ नये ..सुटकेस ब्रिपकेस का घेऊन येऊ नयेत हे मोहिमेत आल्याशिवाय कळत नाही ...
मनात अनेक शंका प्रश्न हे असेच का तसेच का नाही तरीही हे इतके... तरुण ...
म्हातारे ...अपंग... लहान लहान मुलं ह्यांना कसं हे सर्व जमत असेल ..?
याना जमतं तर आपल्याला का नाही ?
हो नाही करता करता
शिवतीर्थावर ( दादर ) प्रत्त्येक रविवारी संध्याकाळी ०६:३० वाजता शिवमानवंदन व्रत घेण्यात येते तिथं अंधेरी वरून हजर रहायचो । असंख्य मुंबई विभागातील धारकरी बंधु यांचे विचार ऐकण्यास मिळायचे । बलिदान मास , दुर्गामाता दौड , शिवप्रताप दिन , व्याख्याने , सत्य इतिहास आणि तो सुद्धा ऐतिहासिक पुराव्या सहित खंडन सोशल मीडियावर धर्म बाटव्या पोस्ट हिंदू धर्म बुडवायला निघालेल्या असंख्य पोस्ट त्यावरील खंडन यावर सत्य उत्तरे पुरावे आपल्या धारकरी बंधू यांच्या कडून मिळत । यातूनच वाचनाची आवड निर्माण होणे , लिखाण तोडक मोडकं का होईना लिहिण्याचा प्रयत्न करणं हे सगळं 2014 ते 2015 पर्यंत अनुभवण्यास मिळाले ।
कित्ती दिवस फक्त साखर बघतच बसणार तिची चव गोड आहे की तिखट हे चाखून बघितल्याशिवाय कसे समजणार ?
अंधेरी हुन कामोठे नवी मुंबईत शिफ्ट झालो...
भक्ती शक्ती धारकरी वारकरी संगम पुणे इथं जाण्याचा योग आला नवी मुंबई मधील असंख्य धारकरी बंधू यांच्या ओळखी झाल्या ..कामोठे मधून दिपक वाळुंज दादा आकाश कव्हर दादा..धनाजी भोसले दादा ..अमोल शितोळे दादा..तेजस राव , तुफान गोवारी दादा..ओमकार राव होनमाणे ..सुरज मुळीक दादा..रवी अभिमाने दादा , विवेकराव जगताप दादा , मिथुन म्हात्रे दादा कित्त्येक धारकरी बंधू मिळाले ।
नवी मुंबई कोपरखैरणे ऐरोली घणसोली नेरुळ जुईनगर वाशी तुर्भे चिंचपाडा मधून जेष्ठ धारकरी बंधु लाभले । मानखुर्द मधून यतेश दादा हेबाळकर यांच्या कडून समजले...यंदाची ( 2017 ची धारातीर्थयात्रा ( मोहिम ) श्री पन्हाळगड ते श्री विशाळगड - मार्गे पावनखिंड ।
हे ऐकून आणि फेसबुक वरील इतर धारकरी बंधू यांच्या पोस्ट वाचून मनात सारखे सारखे पावनखिंड -बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू शिवा काशीद आणि असंख्य आपले मावळे ज्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी आपले प्राण पणास लावले त्यात आपले पुर्वज ही असतीलच...आपल्या शरीरात ही त्यांचाच अंश आहे...उगीचच का कोणीही देव देश धर्माबद्दल ... शिवप्रभुंच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी पूर्ततेसाठी तयार होतो...आपल्या रक्तातच मराठी बाणा आहे आम्ही फक्त सोशीलमीडियावरच जय जिजाऊ जय शिवराय करत बसणार का ? कित्ती दिवस फक्त बोंबलत च फिरणार ...महाराज हे फक्त शिवजयंती पुरतेच चौकात येणार का ...ते पण एखाद्या बेनर वरच्या एका कोपऱ्यात बाकी फक्त कार्यकर्त्यांचे फोटो ? किती दिवस फक्त हेच बघत बसणार ...
मनात असंख्य प्रश्न ...प्रश्न हे प्रश्नच ठेवणार का ?
येतेश राव हेब्बाळकर दादांचा फोन आला चला दादा सराव मोहीम आहे..रोहा जवळ अवचितगड आहे तिथं ...
आपल्याला शनिवारी रात्री ठीक आठ वाजता पनवेल स्टेशन ला भेटायचे आहे...
क्षणाचाही विलंब न करता हो म्हणालो...
अवचितगड कुठला काय काहीच माहीत नाही ...हो म्हणालो..दोन दिवसांनी शनिवारी संध्याकाळी ठरल्याप्रमाणे ठीक आठ च्या आगोदरच ...पनवेल स्टेशन ला हजर झालो...पोस्ट मध्ये सांगितल्या प्रमाणे दोन वेळेची शिदोरी ..3 मोठ्या पाण्याच्या बोटल्स , आणि जे सांगितलेलं ते घेऊन ..
नेहमीचा वेष व भारतीय पद्धतीची पांढरीच टोपी घेऊन हजर झालो...सर्व धारकरी बंधू यांच्या सोबत मोहिमेतील श्लोक पद्य गीतं म्हणत आमची सराव मोहीम सुरू झाली...
यतेश दादा मंगेश नलवडे दादा , अजय बर्गे दादा , स्वप्निल यादव दादा..रवींद्र कोळेकर , स्वप्निल झणझने , अस्मित कोंडाळकर , महेश फावडे दादा ज्यांनी पहिल्या धारातीर्थ मोहिमा केलेल्या त्यांच्या प्रत्त्येक सूचनांचे पालन करत होतो आम्ही सर्व ...!!
अवचित गडाच्या पायथ्याला पोहचल्यावर...गावातील मंदिर च्या प्रांगणात भगवा ध्वज लावून रांगेत चार चार च्या लाईन करून त्या समोर प्रेरणा मंत्र घेऊन श्लोक घेऊन..
सर्व धारकरी एकत्र गोल करून शिदोरी खाण्यापूर्वी श्लोक ...मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे ऍन मी सेवणार...घडो माझिया हातूंनी देश सेवा ..
हे सर्व आमच्यासाठी नवीनच होतं ..कुतूहल सुद्धा होतं.. अरे वा..जेवण्यापूर्वी आपण श्लोक म्हणतो का ..म्हणलेच पाहिजेत..
पहाटे 5 वाजता उठून सुर्य नमस्कार जोर बैठका ..
प्रेरणा मंत्र म्हणून अवचितगड कडे प्रस्थान... गीतं म्हणत श्लोक म्हणत ..अवचित गडावर पोचल्यावर त्या गडाची माहिती धारकर्यानी सांगितली ...
सराव मोहिमेत सर्व धारकरी बंधू आपापले गाव तालुका जिल्हा माहिती एक एक पुढे येऊन सांगत होते...
त्या वेळी आम्हास समजले रायगड जिल्ह्यातून पेण चे महाविद्यालयात शिक्षण घेणारे प्रणय हरिश्चंद्र पाटेकर हे दादा सुद्धा आहेत । आणि रायगड मधून महाड जवळचे अविनाश चौधरी संकेत भोसले दादा सुद्धा आहेत ...पनवेल विभागातून नानोशी गावचे विक्रम पाटील दादा ..
अभिमान वाटला आपल्या गावजवळचे सुद्धा आपले बांधव आहेत । सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव मधून नवी मुंबईत राहणाऱ्या धारकरी बंधूंच्या ओळखी झाल्या त्या कायमच्याच ।
शिव शंभु रक्तगटाचे लाखो धारकरी मोहिमेत मिळणार भाग्यच ।
त्या सराव मोहिमेने बरच दडपण कमी झालं होतं ...
आयुष्यातली पहिली धारातीर्थ यात्रा ( मोहीम ) श्री पन्हाळगड ते श्री विशाळगड पावनखिंड मार्गे ...
सुरुवाती पासून समारोपा पर्यंत केली..!!
मोहिमेत फक्त चालणेच नसते तर इतिहास तज्ञांची व्याख्याने असतात , गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व मोहीम शिस्तबद्ध असते...
महाजन गुरुजींच्या पहाटेच्या गीतं श्लोक आवाजांनी मंत्र मुग्ध व्हावे असेच होते...क्षणात आळस झोप नाहीशी होऊन सूर्यनमस्कार जोर बैठका मारण्यासाठी आपण भगव्या ध्वजासमोर येतो ।
बरेच अनुभव मोहिमेतून शिकायला मिळतात..
आपण आपल्या शरीराचे कित्ती लाड करतो आणि करायला नाही पाहिजेत हे आपण मोहिमेत शिकतो...पाणी अन्न किती वाया घालवतो त्याचे महत्व पाण्याच्या एका एका थेंबाचे महत्व अन्नाच्या एका एका कणाचे महत्व आपल्याला मोहिमेत समजते...आपले मावळे कसे जगले असतील कसे लढले असतील ...देशाच्या सीमेवर जवान कसे जगत असतील याचे भान याचे महत्व आपल्याला मोहिमेत समजते...
आपण एक हो हो फक्त एक मोहीम केल्या नंतर पुढच्या मोहिमेची आतुरतेने वाट बघत असतो त्याच क्षणापासून...
सह्याद्रि शिवप्रभु शंभुराजे हिंदू धर्म राष्ट्र प्रेम देव देश धर्मा प्रति निष्ठा आपुलकी निर्माण होते...
आठरा पगड जातीच्या आपल्या बांधवांसोबत ते मोहिमेतील चार पाच कसे निघून जातात समजत सुद्धा नाही ।
मोहिमेतून आपण घरी आल्यावर येणारा प्रत्त्येक दिवस हा यशाचाच असतो...निराशा मरगळ केंव्हाच झटकून दिलेली असते...
वर्षभर श्रीशिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान , आदरणीय गुरुवर्य , आणि शिवप्रभु यांना स्मरूण गावोगावी , शहरात जिथं जिथं शिवपाईक धारकरी बांधव राहतात त्या विभागात श्री दुर्गामाता दौड , शिवसाधना , धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास , भक्तीगंगा शक्तीशक्ती संगम ( वारकरी धारकरी संगम ) , शिवप्रताप दिन , शिवराज्याभिषेक , शिवजयंती असे कित्त्येक व्रत घेतले जातात ।
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
यंदाची...२०१८ ची जगातील एकमेव धारातीर्थ यात्रा मोहिम श्री प्रतापगड ते श्री रायरेश्वर ..जावळी अरण्य मार्गे...
मोहिमेचा सांगावा आला आणि आनंदाला पारावार राहिला नाही ...उत्सुकता लागून राहिली मोहिमेची...
कित्त्येक मित्र बांधव विचारतात कधी आहे मोहीम कुठं आहे मोहीम कशी असते मोहीम बऱ्याच शंका असतात मोहिमेबद्दल जशा मला होत्या...
अशा ओळखीतल्या बांधवाना आवाहन केले भावांनो या सराव मोहिमेत या...
आपल्या गावाजवळच श्री प्रबळगड आहे...पनवेल नवी मुंबई जवळच ...
जे आलेत सहभागी झालेत ते खरंच भाग्यवंत च आहेत...!!
नवी मुंबई विभागातील आणि पनवेल जवळच्या गावांसाठी
सराव मोहिमेचा दिवस ठरला ०९ डिसेंबर रात्री पनवेल एसटी डेपो मध्ये ठीक ०६:०० वाजता एकत्र येणे ।
आम्ही सर्व पनवेल एसटी डेपोत एकत्र येऊन ...
जय शिवराय ..जय श्री राम...गळा भेटी कारण धारकरी बंधूंना भेट घेण्याची जी तळमळ आदर असतो ते मोहिम केलेल्यानांच समजतो...!!
पनवेल एसटी व्यवस्थापण कडून श्री प्रबळगड पायथ्याशी असलेल्या गावापर्यंत नेऊन सोडायचे आणि घेऊन यायचे काम अप्रतिम रित्या पार पाडले...खरंच खुप खुप धन्यवाद । त्यासाठी ओएनजीसी कॉलनीत राहणारे आपले धारकरी बंधू अविनाश चौधरी दादा...नानोशी गावचे आपले सर्वांचे लाडके विक्रम पाटील दादा..👌👌 🚩🚩
सराव मोहीम श्री प्रबळगडावरच का ?
रात्रीच्या अंधारात माची प्रबळगडाच्या ठाकूरवाडी पर्यंत सर्व धारकरी श्लोक गीतं म्हणत शांत पणे पोहचले...!!
माची वर पोहचल्यावर तिथं सुरू असलेल्या पार्ट्या शेकोट्या तरुणांची थिल्लर बाजी स्पीकरचा मोठा मोठा आवाज धांगडधिंगा हे सगळे चाळे नवीनच आलेल्या आमच्या बांधवाना बघायला मिळाले ..आमचे नवीनच आलेले बांधव म्हणू लागले..हे काय किल्ला आहे ? मग हे असले प्रकार इथं कशे होतात? गांभीर्य समजत नाही का यांना... चला समज देऊ त्यांना..वगैरे वगैरे...
पण
पण
आपले जेष्ठ धारकरी नवी मुंबई प्रमुख आपले सर्वांचे आदरणीय भरत माळी बापू यांनी आदेश दिला की ...आपण सराव मोहिमेला आलेलो आहे...हे प्रकार नित्याचेच आहेत । सर्वांनी यातून शिकावे गडांवर काय करावे काय करू नये...!!
त्यांना शिकवायची आणि समजवायची ही वेळ नाही आपण ज्या कामासाठी आलोय त्यास महत्व द्यावे...सर्व धारकरी एका ठिकाणी येऊन भगवा ध्वज रोवून सर्व शिस्तीत रांगेत त्या समोर ...उभे राहून प्रेरणा मंत्र घेऊन..सर्वांनी आणलेली शिदोरी घेऊन ..भोजन करण्यापूर्वी चे श्लोक घेऊन भोजन सुरू झाले...
तो पर्यंत जे आमचा आवाज ऐकून जे आलेल्या पर्यटकांचे , गड ट्रेकिंग च्या नावाखाली थिल्लर चाळे सुरू होते ते सर्व बंद झाले ..होते एकदम चूप झालेले । पहाटे पाच वाजता दिवसाची सुरुवात झाली...अवघा प्रबळगड धारकरी मय झालेला होता...
पहाटे भगव्या ध्वजास वंदन करून...🚩सुर्य नमस्कार :- शिवसुर्य मंत्र 🌅
०१ ) ओम मित्राय नमः
०२) ओम रवये नमः
०३ ) ओम सूर्याय नमः
०४ )ओम भानवे नमः
०५ ) खगय नमः
०६ ) ओम पुष्ने नमः
०७ )ओम हिरण्यगर्भाय नमः
०८ )ओम मारीयाचे नमः
०९ )ओम आदित्याय नमः
१०)ओम सावित्रे नमः
११) ओम आर्काय नमः
१२) ओम भास्कराय नमः
जोर बैठक :- जय हनुमान जय बलभीम जय बजरंग ।
मोहिमेत शिवप्रभु दौड असते...ज्या धारकरिंचा या दौड मध्ये पहिला क्रमांक येतो त्यांस पुढील मोहिमेत भगवा पुजनीय ध्वज घेण्याचा मान मिळतो...!!
सराव मोहिमेस सुरुवात झाली...जेष्ठ धारकरी आपले स्वप्निल यादव दादा...यतेशराव हेब्बाळकर दादा , मंगेश नलावडे दादा , भरत माळी काका यांच्या सूचनांचे पालन करत सर्व एका रांगेत श्री प्रबळगडाकडे चालू लागले...विक्रम पाटील दादा..संतोष परभने दादा..अविनाश चौधरी दादा पुढे होऊन मार्ग दाखवण्याचे कार्य करत होते...मी सर्वांच्या मागे होतो...कारण मागे कोणी राहू नये । तसा प्रबळगडा वर मी १४ वेळा गेलेलो आहे...प्रत्त्येक वेळी नवनवीन रुपात दिसणारा हा गड आहे...पाऊस जास्त होऊन गेल्यामुळे माती वाहून गेल्यामुळे वाटेत पाण्याच्या लोटामुळे मोठं मोठे पाट खड्डे झालेले आहेत बरेच नवनवीन मार्ग काढण्यात आले आहे...!!जानेवारी फेब्रुवारी पर्यंत वाटेच्या दोन्ही बाजूला गवत वाढलेलं च असतंय..!!
काही ठिकाणी एप्रिल नंतर वणवा लागून गवत नाहीसा होतो..
प्रबळगडावर पाण्यासाठी खुपच वणवण करावी लागते..प्रत्त्येकानी दोन तीन पाण्याच्या भरलेल्या बोटल्स घेऊनच जावे अन्यथा पाणी पाणी करून जीव मेटाकुटीला येईल..रात्री चा गडावर येण्याचा प्लॅन कराल तर बेटरी पाहिजेच ।
काही पर्यटक म्हणून येणारे साधी बेटरी सुद्धा घेऊन येत नाहीत...फक्त मौज मजा म्हणून गडावर येऊच नये...हात हालवत येतात पाणी सुद्धा घेऊन येत नाहीत..असे करू नये ।
धारकरी बंधूंना मोहीम केलेली असते त्यामुळे हे बारीकसारीक उपदेश द्यायची गरज नसते...!!
प्रबळगडावर पाण्याचीच समस्या बिकट आहे..आणि पाण्याची किंमत काय असते जगण्यासाठी तर एकदातरी प्रबळगड करावा । बरेच पर्यटक माची पर्यंत येतात कलावंतीन बघून गड उतरतात । जे कोणी प्रबळगडावर येतात त्यांना गडाची पुर्ण माहिती नसल्या मुळे भरकटत बसतात ।
आपले संकेत भोसले दादा , विक्रम पाटील दादा ,
संतोष परभने दादा यांच्या मुळे गडावरील वाघाबिळ.. तीन वाडे , महादेव मंदिर , काळा बुरुज जिथं जायला आणि परत मागे यायला 3 तास तरी लागतात त्याच ठिकाणी पाणी उन्हाळ्यात सुद्धा मिळते । गडावर पाण्याची टाके आहेत पण ते पाणी पिण्यास लायक नसते त्यात पाखरं मरून पडलेली असतात । बहुतेक वेळा बघितलंय आणि कित्त्येक जणांकडून ऐकलय नकोरे बाबा एकदा बघितलंय तो प्रबळगड परत त्याचा नाव काढणार नाही ती ओढ्यातून वर जाणारी सरळ वाट कसली ती...कसातरी वरती गेलो आणि परत आलो । पाणी पाणी करून मरावं लागतं... आणि हेच माझ्या मनाला झोम्बत राहतं..! म्हणून विचार केला सिंहगड सारखे पिकनिक पॉईंट करून टाकलेले गड असल्या भुरट्या ट्रेकर्स? ना मस्तच वाटतात कारण गाड्या पार गडाच्या दारात जातात...
इथं कशी फा फु होते ना ...अरे ते गडकिल्ले आहेत...ते काय तुमचे घरदार नाही जे सजवत राहावे तोडावे फोडावे जोडावे..आज त्यांची अवस्था अशी का आहे हेच तर शिकण्यासाठी आम्ही धारकरी इथं येतो...प्रत्येक धारकरी हा गडावर जाऊन कामे करतोच..इतर वेळी..
एप्रिल मे जुन मध्ये आम्हाला प्रबळगड संवर्धन समिती यांस कडून इथं काम करण्याची संधी मिळाली...एक मातीने मुदलेले पाण्याचे टाके ...टाकं कसलं हो ते कित्त्येक वर्ष भग्न अवस्थेत पडून राहिलेलं वाट बघत होत जणू काही कोणी तरी येईल मला ह्या पालापाचोळा झाडे झुडुपामधून मोकळं करील , माझ्यावर पडलेले दगड माती बाजूला करून मला मोकळा श्वास देण्याचे काम करील.. पनवेल मधील आपले सागर मुंडे दादा, प्रणय चोणकर दादा , संदेश तिरलोटकर दादा , राजपुरकर दादा , मनोज माने दादा, विशाल पाटील दादा , मिथुन म्हात्रे दादा, हनुमान वायभासे दादा , आणि विक्रम पाटील दादांच्या नानोशी गावातील सगळीच मित्र मंडळी सेना शिवसंग्राम प्रतिष्ठाण , शिवधीन सेना पुणे वरून आशुतोष देशमुख दादा , महेश रेणुसे दादा..आणि काही संस्था संघटना , आज हयात नाहीत ते आपले अरविंद बोराडे दादा आमच्या सोबत होते सर्वांनी घेतला वसा ..आणि या टाक्याला मोकळा श्वास दिला ।
सराव मोहीम च्या निमित्ताने परत इथं येऊन पोहचलो...आणि पाण्याने भरलेले टाके पाहून धन्य जाहलो..!!
गडावर सर्व धारकरी एकत्र एका ठिकाणी बसून प्रत्येकजण आपली आपली ओळख सांगत होते..
🚩🙏🚩🙏🚩🙏🚩वाशी चे आपले प्रमोद पाटील दादा जणू काही या पृथ्वी वरील दुसरे गंधर्वच , दादांच्या आवाजातील गीतं श्लोक ऐकतच रहावे ऐकतच रहावे ...
प्रमोद दादांनी आपल्या धारकरी जीवलगांची राष्ट्रभक्ती धारा ची तहान भुक ओळखुन आपल्यासाठी राष्ट्रभक्तीधारा च्या प्रत अवघ्या शुल्क ४० /- तयार केलेल्या आहेत प्रत्त्येकांनी घ्याव्यात ।
मोहीम का करावी कशासाठी ?🚩🙏🚩
आपले भरत माळी बापू यांनी मार्गदर्शन केले ते...
वाचावेच
🚩🙏🚩
श्री प्रतापगड ते श्री रायरेश्वर - मार्गे जावळी अरण्य || धारातीर्थ यात्रा ( मोहीम ) ||
` हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळून उणीपुरी सत्तर वर्षे उलटून गेली . तरी पण हिंदु समाज मनाने पुर्णतः परतंत्रच आहे . आशा परिस्थितीत श्री शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या व अनेक हुतात्म्यांच्या व स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने धारातीर्थे बनलेल्या गडकोटांच्या मोहिमा , प्रतिवर्षी आयोजित करण्यात येतात , मृतवत अंतःकरणाची हिंदू समाजातील तरुण पिढी , धेय्यवादी बनविण्याचा , मोहिम हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे .
यातून उध्वस्त हिंदुसमाजाचा संसार दुरुस्त करणारी , अदम्य इच्छाशक्तीचे व उत्तुंग आकांक्षेची प्रखर देशभक्त , धर्मभक्त व स्वातंत्र्य भक्त ध्येय्यवादी तरुण पिढी घडावी , हे एकमेव लक्ष्य आहे .
' श्री रायरेश्वरावरती वयाच्या १४ व्या वर्षी श्री शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन हिंदवी स्वराज्याचे सिंहासन स्थापण्याच्या प्रयत्नांना प्रारंभ केला त्यासाठी त्यांनी श्री रायरेश्वराचे शुभाशीर्वाद घेतले . तसेच आतां हि
" हिंदवी स्वराज्याच्या सुवर्ण सिंहासनाची पुनरसंस्थापणा करण्यासाठीच " अदृश्य व अशरीररुपानी श्री रायरेश्वरावरती असणाऱ्या श्री शिवछत्रपतींच्या बरोबर आपण गडकोट मोहिमेच्या मार्गातून श्री रायरेश्वराचे शुभाशीर्वाद मागण्यासाठी जात आहोत .
या परम भाग्याचा स्वानुभव घेण्यासाठी प्रत्येक तरुणाने या मोहिमेत सहभागी व्हावे .
१) मोहिमेचा कालावधी - माघ शु || ९ || तें माघ शु || १४ || श्री शिवशक ३४४ म्हणजेच शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०१८ ते मंगळवार दिनांक ३० जानेवारी २०१८ पर्यंत .
२) मोहिमेचे प्रारंभस्थान - दुर्ग श्री प्रतापगड .
३) प्रारंभस्थानी पोहचण्यासाठी वेळ - शुक्रवार दिनांक २६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या आंत पोहचावे .
४) मोहिमेची प्रारंभ वेळ ठिक - दिनांक २६ जानेवारी २०१८ या दिवशी शुक्रवारी दुपारी ठिक ०१:०० वाजता , श्री तुळजाभवानी मातेच्या आरतीने शुभारंभ होईल .
५ ) शिदोरी :- मोकळ्या वातावरणात व भरपूर परिश्रम केल्यावर नेहमी पेक्षा आपणाला अधिक जेवण लागते , हे लक्षात घेऊन प्रत्त्येकाने किमान दहा वेळा पुरेल व टीकेल एवढी भरपूर शिदोरी स्वतः बरोबर आणावयाची आहे .
६) पाणी व्यवस्था :- किमान तांब्याभर पाणी मावेल एवढा जलकुंभ प्रत्येकाने बरोबर घ्यावयाचाच आहे .
७) अंथरून पांघरूण :- किमान पातळ लहान सतरंजी व चादर ।
८) शुल्क :- मोहिमेतील प्रत्येक धारकर्यानी प्रत्येकी रु. ५०/- शुल्क भरणे आवश्यकच आहे .
९) गणवेश :- नेहमीचा वेष व भारतीय पद्धतीची पांढरीच टोपी घातली पाहिजे . कानापर्यंत उंचीची काठी प्रत्येक पाईकांनी आलीच पाहिजे .
समारोपाच्या दिवशी म्हणजेच दि. ३० जानेवारी रोजी प्रत्येकाने ' भगवा फेटा ' बांधलाच पाहिजे .
१० ) अन्य साहित्य :- हळदीची पुडी , बिब्बा , विजेरी , सुईदोरा , दंतमंजन , लहानशी वही व लेखणी .
११) निषिद्ध म्हणजेच टाळावयाच्या गोष्टी :- १ ) पत्ते , बुद्धीबळपट , मुखसारंगी , गॉगल , उशी , अंगठी , लॉकेट , घड्याळ व कोणत्याही व्यसनाचे पदार्थ मोहिमेत बरोबर मुळीच आणू नयेत . आणल्यास कायमचे जप्त करून शिक्षा केली जाईल. २) अन्य प्रकारची टोपी , हॅट , पनामा कॅप व भडक रंगाचे रंगीबेरंगी कपडे , ट्रॅक सुट व मंडळांच्या नावांचे व इंग्रजी भाषेत छापलेले रंगीबेरंगी बनियन आदी घातलेले मुळीच चालणार नाहीत.
१२) तयारी करताना घ्यावयाच्या महत्वाच्या गोष्टी :- १) स्वयंस्फुर्त तरुणानीच मोहिमेत यावे , चांगिभंगी वृत्तीच्या तरुणांनी मुळीच येऊ नये . २) मोहिमेच्या प्रारंभ स्थानापासूनच मोहिम करणे पेलत असेल त्याच तरुणांनी यावे अन्यथा येऊ नये . ३) अवजड सामान व मौल्यवान वस्तू आणू नयेत . सुटकेस , ब्रिफकेस वा अन्य तकलादू बंदांच्या व पातळ पिशव्या घेता कामा नयेत त्या टिकत नाहीत . ४) कातडी बुट त्रासदायक ठरतात , नेहमीची सवय असेल तरच घालावेत . ५) पाठीवरील सैनिकी पिशवी उत्तम , नसल्यास वळकटी दोरीने बांधून पाठीवर पिशवीसारखे अडकविणे . ६) थंडीच्या दृष्टीने अंगावरील कपडे घ्यावेत . ७) बरोबर घेतलेल्या सामानाचा बोजा घेऊन , डोंगरातून चालावयाचे आहे , म्हणून कमीत कमी सामान घ्यावे .
१३) प्रत्त्येक धारकर्यांने मोहिमेसाठी करावयाची शारीरिक व बौद्धिक तयारी :- मोहिमेची तयारी म्हणून प्रत्त्येक धारकऱयांने नित्य पळणे , जोर बैठका मारणे , सुर्यनमस्कर घालणे असा व्यायाम तत्काळ सुरू करावा , तसेच " राजा शिवछत्रपती " या ग्रंथाचे नित्य वाचन सुरू करावे .
मोहिमेस येणाऱ्या प्रत्येक धारकऱयांने खालील श्लोक पाठ केलेच पाहिजेत .
🚩🚩🚩🚩🚩🚩
राखावयास आपुला " हिंदुराष्ट्रवाडा " |
आहेत कोण रिपु ? हा करूया निवाडा ||
गांढयाळ हिंदु आणि ख्रिश्चन म्लेंच्छ वैरी |
संपवावयास सगळे बनू " अफजल्ल्यारी " || १ ||
विझतात जे आम्ही न ते चुलीतील निखारे |
जरी नाशवंत असली आमुची शरीरे ||
ठासून चित्ती भरला " शिवसुर्य जाळ " |
करणार आम्ही पदच्युत ही कृतांत काळ ||२ ||
" शिवबा संभाजी " बीजमंत्र पुरुषार्थ दाता |
गांढ्याळ वृत्ती अवघी क्षणी भस्मकर्ता ||
हा बीजमंत्र जरी चित्ती धरेल कोणी |
येऊन राहतील उभय उरीं खड्गपाणी || ३ ||
पूजा तुझी आम्ही करूं तुळजाभवानी |
पूजा तुझी आम्ही नररुड चिनी पाकिस्तानी ||
करणार सर्व रिपूची परिपूर्ण राख |
शिवबासमान उरीं दे रिपुसुड आग || ४ ||
🚩🚩🚩🚩🚩🚩
|| राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ ||
🚩🚩🚩🚩🚩🚩
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा