"धारातिर्थ(गडकोट मोहिम)यात्रा-२०१७"

मयंक दुबे updated his profile picture.
माझं अनुभव...(भाग-२)


"धारातिर्थ(गडकोट मोहिम)यात्रा-२०१७"
'किल्लेश्री.पन्हाळगड ते किल्लेश्री.विशाळगड'
(#मार्गेश्री.पावनखिंड)
(०१-०२-२०१७ ते ०५-०२-२०१७)
माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण(ते ५ दिवस).
___________________________
आता रात्र झाली सकाळी निंघायचं होतं पावनखिंडसाठी हो हो, हे समजता क्षणीच डोळ्यातुन झोप उडाली सगळे धारकरी झोपले पण मी फक्त एकची विचार करत होतो की कशी असेल ती पावनखिंड...? कशे असणार ते मावळे...? कशे असतील भगवान श्री.शिवछत्रपती...? कशे असतील श्री.बाजीप्रभू देशपांडे...? कशे असतील ते नरवीर श्री.शिवा काशिद...? कशे असतील ते श्री.फुलाजीप्रभू देशपांडे...?
मी शिवचरित्र वाचलं नव्हतं फक्त त्या रात्री मी कल्पनाच करत होतो आणि आठवत होतं श्री.स्वातंत्र्यविर सावरकर ह्यांनी लिहीलेलं श्री.चारूदत्त आफ्ळे बुवांच्या आवाजात तो पोवाडा लय आतुर होतो ती श्रीक्षेत्र.पावनखिंड बघायला.
शेवटी सुर्य उगवलाच सकाळ झाली बाटलीत असलेलं पाणी संपलं जितकं पाणि होतं त्यानं शुध्द होऊन तोंड धूवुन बसलो पण इतर धारकरींकडे पाणीच नव्हतं सगळे वाट बघत होते पाणी कधी येईल त्याची आणि व्याख्यानला सुरवात झाली गुरूजी धारकरींच्या मधात येऊन बसुन व्याख्यायन एकु लागले व
तितक्यात पाण्याचं एक टेंकर आलं व पाठीमागचे धारकरी पळुन त्या टेंकरकडे गर्दी करू लागले व ज्यांच व्याख्यान सुरू होता ते गप्प झाले गुरूजींनी पाठीमागे वळुन बघितलं तर पाठीमागचे धारकरी गायब अण ती गर्दी टेंकरकडे आहे
गुरूजींनी हे बघताच त्वरीत माईक सांभाळला व अनुद्गारले
"आह्हा!!! पाण्याच्या टेंकरकडे गेलेले सगळे परत येतील अगदी लवकरात लवकर.(टेंकरकडची गर्दी २ मिनीटात हटली.)
आपल्या अवती भवती हे किती मोठ-मोठे वृक्ष उभे आहेत हे वन किती घनदाट आहेत ह्यांना काय तहान नाहि लागत...? ह्यांना कोण देत असेल पाणि...? त्यांना वर्षातुन फक्त एकचदा पाणि भेटतो तेही पावसाळ्यात तरीही ते निष्ठेने उभे आहेत व आपल्या सावली,प्राणवायु व हवा देत आहेत ठिक त्याच निष्ठेने आपण रहावं वागावं
माणुस हा प्राणि आहे पण प्राणि हा माणुस नाहि आहे कारण प्राण्यांकडे अनुशासनचा अभाव आहे म्हणुन ते प्राणी आहेत आपण अनुशासनाने राहु शकतो म्हणुन आपण मानव आहोत
आपण प्राण्यासारखे वागु नये.
ऐऐऐ चल बस खालती बस खालती हा हा तुंच तुंच तु बस खालती आता जोवर व्याख्यायन संपत नाहि!!! तोवर कोणीच बसल्या जाग्यावरून हालणार नाहि!!!"
अगदी एक ते दीढ तास पर्यंत व्याख्यायन चाललं पण जाग्यावरून कोणीच नाहि हाललं कारण आदेश गुरूवर्यांचं होतं
आणि डा.अमरराव अडके ह्यांनी प्रसंग सांगितलं होतं पावनखिंडचं एक एक मावळा कसा कसा धारातिर्थ गेला ते एकुन संपुर्ण परिसरात चिरशांतता झाली आणि मग गुरूजींनी काहिवेळ मार्गदर्शन केलं ३ दिवस झाले होते मोहिमेला आणि हा चौथा दिवस होता ह्या तीन दिवसात गुरूजींनी धारकऱ्यांना आदेशच दिलं होतं पण त्यादिवशी गुरूजींनी म्हटलं
"मी आत्ता पर्यंत आदेशच देत होतो पण आता आदेश नाहि देणार आता कळकळीची विनंती करणार तुम्हा सर्वांशी की आता आपला पुढचा प्रवास हे श्री.पावनखिंडसाठी आहे तिथे पोहचल्यावर ती माती कपाळी ना लावता त्या मातीची दोन थेंब आपल्या जिभेत ठेवून गिळुन घ्यायची जेणेकरून आपलं रक्तगट हा शिवाजी-संभाजी-बाजीप्रभू-शिवा काशिद-फुलाजीप्रभु रक्तगट झालं पाहिजे जे ह्या भारतमातेसाठी आणि हिंदू धर्मासाठी कामी येईल."
आणि हे उद्गार काढत असतांना गुरूजींच्या डोळ्यातुन ढळढळ अश्रु गळत होते व आम्हा धारकऱ्यांचे डोळे पण पाणवले होते.
आणि गुरूजींनी एक श्लोक म्हणायला सांगितलं व गुरूजींसोबत तो श्लोक बोलून आम्ही श्रीक्षेत्र.पावनखिंड येथे मार्गस्थ झालो तो श्लोक म्हणजे,
शिवा-काशिदांचा असामान्य त्याग...
मलाही असा लाभू दे कर्मयोग...
असे मागणे नित्य तुळजापदाला...
मराठा म्हणावे अश्या वाघराला...
---गुरूजी.
महाभारतात एक प्रसंग आहे योगेश्वर श्री.कृष्ण आणि माता रूख्मणि ह्यांचा
तर श्रीकृष्णनी माता रुख्मणिला द्वारका नगरी विषयी एक खुप चांगला प्रसंग सांगितलंय की
"जो मनात कसलाही लवलेष ना बाळगता माझ्यावर सच्ची निष्ठा ठेऊन माझे दर्शन करायला द्वारकेकडे एक पाऊल टाकणार तर त्याच्याकडे ही द्वारका नगरी हजार पाऊलं जवळ जाणार."
ह्या वाक्यची खरी प्रचिती मला पावनखिंडकडे जातांना लागत होती. काय ते असतील मावळे ज्यांनी अखंड हिंदवी स्वराज्यासाठी म्लैंच्छांचा बंड नष्ट करण्यास स्वत:च्या प्राणाची बाजी लावली. खरंच त्यांचा रक्त ज्या घोडखिंडीत सांडलंय ती खरंच कोण्या काशि,मथुरा,अयोध्या पेक्षा नक्कीच कमी नाहि!!! म्हणुन ती पावनखिंड आहे. त्या खिंडीत आहे धर्मभक्ती-राष्ट्रभक्ती-सत्य-स्वाभिमान त्या मातीला ज्या कोणी स्वाभिमानशुन्य हिंदूने गिळंकृत केलं तो स्वाभिमानी झाल्याशिवाय राहणार नाहिच!!!
प्रत्येक हिंदू हा आयुष्याच्या शेवटच्या टप्पयात म्हणजे म्हातार वयात तिर्थ यात्रा करतात. कशासाठी करतात ती तिर्थयात्रा...? काय होतो तिर्थयात्रा केल्याने...?
तर त्याचा उत्तर आपल्या धर्मग्रंथातच आहे की ती यात्रा केल्याने आपल्याला मोक्षप्राप्ती मिळते आपल्याला भगवंत आपण केलेल्या जिवनातले पापातुन काहि प्रमाणात मुक्त करतो अशी आपल्या हिंदुची श्रध्दा आहे. आता त्याने मोक्ष मिळतो की नाहि हे आपल्याला माहित नाहि पण आत्मिक सुख, जिवनाचा आनंद, व जिवनातल्या क्लेषातुन मुक्त मानव नक्कीच होतो .
अगदी थोडक्यात आपण ती तिर्थयात्रा वैयक्तीक स्वार्थासाठी करतो पण
हि धारातिर्थ(गडकोट-मोहिम)यात्रा हे वैयक्तीक स्वार्थासाठी नसुन तर देव-देश-धर्माच्या कल्याणार्थ आहे. परकीय शक्तींचा यदाकदाचित भारतावर आक्रमण झालं तर भारताचं सैन्यबळ आणि सुरक्षाबळ त्या परकीय शक्तींशी झुंजणार पण त्या परकीय शक्तींना पोषक ठरणारे आपल्याच भारत मातेच्या छातीवर राहणारे मंबाजी भोसले,जसवंतराव कोकाटे,गणोजी शिर्कें,चंद्रराव मोरे व इ. गद्दारांशी कोण झुंजेल...? आपलं सैन्यखाता परकीय शक्तींशी लढणार की ह्यांना बघणार...? मग आपलं तरी काहि कर्तव्य लागतोच न्(?) आपण पण ह्या भारत मातेचे पुत्र आहोत न्(?) की फक्त देशाच्या सुरक्षेची जबाबदारी मक्तेदारी भारतीय सैन्यानीच घेतलीय???
म्हणुन ही धारातिर्थ(गडकोट-मोहिम)यात्रा बरोबर भारतमाता यात्रा पण आहे जे देव-देश-धर्माच्या उत्थानासाठी निंघते.
#शिवसूर्य_चित्ती_आमुच्या_तळपे_अखंड ।
उध्वस्तनष्ट करूं हें आम्ही म्लेंच्छबंड ।।
हिन्दुसमाज घडवूं शतधा ज्वलंत ।
यवनांत पूर्ण करण्या बनूं या कृतांत ।।
---गुरुवर्य .
हे विचार करत करत अखेर पावनखिंडीत पोहचलोच माहितंच नाहि पडलं की हा प्रवास इतक्या लांबहुन कसं काय संपलं?
असं वाटु लागलं जसं द्वारकाकडे कोण्या श्री.कृष्णभक्ताने एक पाऊल टाकलं तर द्वावरकाने त्याच्याकडे १००० पाऊल जवळं आली
ठिक तसंच धारकऱ्यांनी पावनखिंडसाठी एक पाऊल टाकलं तर पावनखिंड शंभर पाऊल जवळ आली की काय...?
पावनखिंडीत उतरलो व आश्चर्यचकित झाल्याबगैर मी राहिलोच नाहि!!! मी कल्पना पण करू शकत नव्हतो की इतक्या लहान ठिकाणी ३५० बांदल(मावळ्यांनी) हजारोंच्या संख्येने असलेले शत्रूसैन्याला झुंज देऊन श्री.शिवाजी महाराजांना किल्लेश्री.विशाळगडापर्यंत सुखरूप पोहचण्याकरिता एक दिवस झुंज दिली काय असेल त्या मावळ्यांची निष्ठा.
मला ह्या पावनखिंडीत निट दोन मिनीट उभं ही नाहि राहता येतंय कारण इतके मोठमोठे टोकदार दगड आहेत आणि स्पोर्ट्स शुज् घालुन ही त्या दगडांची अणी पायाला रूततंय पण त्या मावळ्यांकडे तर स्पोर्टस् शुझ् ही नव्हते आणि वरून पावसाळ्याचा वातावरण होतं अन्न पाणि ना खाता ते झुंजत राहिले काय असेल त्याचा कारण...? त्याचा कारण नंतर श्री.सद्गुरू समर्थ रामदास स्वामी ह्यांनी आपल्या श्री.संभाजी महाराजांना लिहीलेल्या पत्राच्या काहि मजकुरात सांगितलं आहे की
धर्मासाठी झुंजावे | झुंजोनी अवघ्यासी मारावे ||
मारिता मारीता घ्यावे | राज्य आपुले ||१||
देवद्रोही जितुके कुत्ते | मारोनी घालावे परते ||
देवदास पावती फत्ते | यदर्थी संशयो नाहि ||२||
देव मस्तकी धरावा | अवघा हलकल्लोळ करावा ||
मुलूख बडवावा की बुडवावा | धर्म-संस्थापनेसाठी ||३||
ह्याचसाठी श्री.शिवचरित्रातले असंख्य ज्ञात-अज्ञात नररत्न धारातिर्थ गेलेले आहेत हाच तो एकमेव कारण होय.
ह्यांच्यातली देव-देश-धर्माप्रतिची निष्ठा आपल्यातही यावी ह्यासाठी पावनखिंडीतली माती कपाळावरती लावुन व दोन अंगुली तोंडात टाकुन गिळंक्रृत केली त्यांच्यातली निष्ठा आमच्यामध्येही २% यायला पाहिजे जेणेकरून भारत मातेचं उध्वस्त होत चाललेलं संसार(हिंदुत्व) आम्ही अभेद्य ठेवु शकलो पाहिजे ह्याचसाठी.
चार दिवस होऊन गेलेले होते आणि श्री.विशाळगड कडे समारोपच्या ठिकाणी लवकरात लवकर पोहचायचं होतं कारण अंधार होत चाललं होतं आणि उद्याचा मोहिमेचं शेवटचं दिवस होतं.
आता पाय थकले होते तरीही चालण्याशिवाय काहीही पर्याय नव्हतं कारण थांबलो तर मग उद्याचा समारोप हुकणार होता.
पाय दुखत होते अंधार होत होतं थंड वाढत चालली होती पण शिवभक्तांना अडवण्याचं सामर्थ्य कोणाच्यातही नाहि!!!
म्हणुन असंख्य धारकऱ्यांबरोबर श्लोक गात गात मार्गस्थ झालो किल्लेश्री.विशाळगडाच्या दिशेने. घनदाट अंधार होतं समोर कोण आहे दिसत नव्हतं फक्त जय भवानी जय शिवराय जय श्रीराम जय शंभूराय हर हर महादेव चा नाद च आम्हाला इतक्या अंधारात प्रकाश देत होता.
शेवटी ५ ते ६ तास चालल्यानंतर पोहचलोच श्री.विशाळगडाच्या पायथ्याशी पण आता पुढचा प्रवास खुप कठीण होता कारण १० वाजता तिथे पोहचलोय(विशाळगडाला) पण मुक्काम चा ठिकाण लांब होतं हो, श्री.फुलाजीप्रभू देशपांडे, श्री.बाजीप्रभू देशपांडेच्या समाधी स्थळी समारोप मुक्काम होता.
भुख लागली होती पण आता असंच निर्धार केलं होतं की आता पाणि आणि अन्न मुक्कामच्या ठिकाणीच घेऊ काहिही होऊ दे कारण की आता थांबलो व जेवलो तर आळस येईल व कंटाळा येईल चालायला आणि वरून थंड लागेल. म्हणुन विशाळगडाला चढायला सुरवात केली मधात एक लहान शा गाव लागलं होतं(नाव आठवत नाहि) तिथुन पाण्याची बाटली घेतली व चाललो. पण आता ४ दिवस मोहिमेत चालायला जी दिक्कत आली नाहि ते विशाळगडला पोहचल्यानंतर तेथुन मुक्कामच्या ठिकाणी पोहचायला होत होती कारण विशाळगड चालायला पन्हाळगडापेक्षाही जड आहे आणि अंधारात चालत होतो म्हणुन तसं वाटतं असावं.
पण चालत असतांना समोर एक आजोबा पण हळुहळू चालत होते त्यांना मोट्या कांचचा चष्मा लागलेला होता आणि पायाचाही त्यांना त्रास होता(त्यांच्या चालण्यावरून तसं वाटे.) त्यांच्याकडे टोर्चही नव्हती(माझ्याकडे पण नव्हती मला इतकं त्रास नाहि झालं व आवश्यकता पण लागली नाही.)पण त्यांना चालायला दिक्कत १००% होत होती व ते पाय ही सुरक्षीत ठीकाणी ठेवत होते मग मी त्यांना थांबवलं मी पण एकटं होतो ते पण एकटे होते. मग मी थोडं त्यांना थांबायलं सांगितलं.
मग त्यांच्याशी परिचय केलं व माझं परिचय दिलं दुर्दैवाने मी त्यांचा नाव विसरलो(😢)पण ते बेळगावतुन आले होते. हे त्यांनी सांगितलं. व ते सुरवातीपासुन मोहिम करत आहेत त्यांनी एकही मोहिम चुकवली नाहि ही त्यांची ३७वी मोहिम होती असं त्यांनी सांगितलं आणि त्यांच वय होतं ६७ मग मी बोललो की "आप्पा, तुमचं वय झालंय आणि डोळ्यानं कमी दिसतं व वरून पायची तकलीफ , तुम्ही कशाला येता...?" त्यांनी उत्तर दिलं व त्याउत्तरा मध्ये सकारात्मक आत्मबळ होतं व त्ये एकुन माझे डोळे उघडले त्यांनी उत्तर असं दिलं
"की बाळा, हेच ५ दिवस तर असतात की आपण आपली सगळी मोह माया स्वार्थला त्यागुन देव-देश-धर्म-शिवशंभु-व-ज्ञात-अज्ञात-महापुरूषांच्या पाऊलावर पाऊल टाकुन जगायचे. मी तर ईश्वरीचरणी हेच प्रार्थना करतो की मला मृत्यु ही ह्याच गडकोटांवर आली पाहिजे ज्या मातीत आपल्या बापजाद्यांनी देव-देश-धर्माच्या रक्षणास्तव रक्त ह्या मातीत सांडवलय त्या रक्तातुन पावन झालेल्या धारातिर्थ मध्ये मला मरण आलं तर ते मरण मला स्वर्गापेक्षा नक्कीच कमी नसणार आहे."
हे एकुन मी दोन क्षणासाठी चुप्पच झालो. व हेच विचार करत होतो मनाच्या मनात की ह्यांच्या शिवभक्ती समोर आपलं स्थान शुन्य आहे नाहितर नावाले शिवश्री तर खुप आहेत त्यांची तर लायकीच नाहि!!!
मग आप्पांना बोललो चला आप्पा आता मी तुमच्यासोबत असणार आहे तुम्ही तुमचं हाथ माझ्या खांद्यावर ठेवा.
त्यांनी म्हटलं 'हो बाळा मला निट दिसत पण नाहि आहे ; देव तुझं कल्याण करो.'
अवघ्या रात्री १२ वाजता मुक्कामच्या ठिकाणी पोहचलो व शिदोरी काढली व इतर भागातल्या धारकरींबरोबर खालली व गप्पा मारून झोपुन गेलो.
सकाळ झाली, मोहिमचा शेवटचा दिवस सगळे धारकरी आता वारकरी टोपी नसुन तर भगवा फेटा घालत होते मी पण घालून आता महादेवाचे दर्शन घेऊन व अनेक इतिहास अभ्यासक आले होते त्या प्रमुख मान्यवरांचे व्याख्यान एकत होतो पण लक्ष होते तर माझे फुलाजीप्रभू व बाजीप्रभू देशपांडेच्या समाधीकडे आणि कसं तरी वाटत होतं की आता मोहिम संपणार आहे लवकरच म्हणुन खुप वाईट वाटत होतं व पुढच्या वर्षीची मोहिम ची प्रतिक्षा त्याच क्षणीपासुन करू लागलो होतो(😂).
आणि आता मोहिमेतलं शेवटच्या व्याख्यनाला सुरूवात झाली हो, शिवतपस्वी.गुरूवर्य.प.पू.संभाजीराव भिडे गुरूजी बोलत होते
ते काय बोलले ते येथे लिहीणं शक्य नाहि!!! पण माझं पुढचा जिवनमार्ग आता कोणत्या दिशेने असणार आहे हे त्याच गुरुवाणीने ठरवलं व ३० जानेवारी पुर्वी असलेलं अनिलसुत महाराज ५ फेब्रुवारीनंतर अचानक बदलुन गेला कारण गुरूजींनी पुढच्या आयुष्यसाठी टिकणारी,पुरणारी भरपुर अशी ती शिदोरी बांधुन दिली होती.
आता त्याच शिदोरी च्या आसरे मी माझ्या पध्दतीने काम करतोय धर्म आणि राष्ट्रसाठी अण तेव्हाच गुरूजींनी संकल्प घेतलं होतं
तोडले फोडले जरी सिंहासन...
अजूनही नाही तुटले आमचे मन...
पुन्हा स्थापित करू अभिमानानं...
श्री रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन...
---गुरूजी
मग येतायं न्(?)
ह्या वर्षीच्या मोहिमेत...२०१८
किल्लेश्री.प्रतापगड ते किल्लेश्री.रायरेश्वर
(मार्गेश्री.जावळी अरण्य)
२६ जानेवारी २०१८ ते ३० जानेवारी २०१८.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

karla leni

nageshwar mandir satara

"HINDAVI SWARAJYA SUVARN SINHASAN PUNARSANSTHAPANA NYAS"