वेध मोहिमेचे मोहिम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
कणाद आणि ओम्कार आणि गौरव तिघेही चुनाभट्टी विभागाचे धारकरी, हें तिघेही पहिल्यांदाच मोहिमेत आले. त्यांची पहिलीच मोहीम पन्हाळगड ते विशाळगड. ओंकारला आणि गौरवला मी मोहिमेबद्दल सांगितल आणि हें दोघेही मोहिमेत आले. कणाद हा रोहित महाडिकचा भाऊ म्हणून दादाला बघून तो मोहिमेत आला. पहिला दिवस आणि पहिला मुक्काम पन्हाळगड़ावर ती संख्यापाहून तिघेही भारावलेले होते. तिघांच्याही चेह-यावर काहीतरी नवीन अनुभवत आहोत हा आनंद होता. गुरुजींचे दर्शन यांना लाभले. यांना गुरुजींबद्दल फार माहीत नव्हत.
ओंकारला मी सांगितल होत की गुरुजी पायात कधीही चप्पल घालत नाहीत. गुरुजींना पाहून त्याने निर्धार केला की मी मोहीम अनवाणी पूर्ण करणार आणि फक्त निर्धारच नाही तर त्याने मोहीम अनवाणी करूनही दाखवली, माझ्या मोहिमा होऊनही मला हें जमले नाही परंतु ओंकार ने मात्र हें केल. गुरुजींनी गडकोटांच महत्व सांगितल आणि ते त्याला पटलं!
कणाद बद्दल सांगायच तर भावाला बघून भावाचे अनुभव ऐकून मोहिमेत आलेला होता. हाही तसाच फार भारावून गेलेला. झाल अस आम्ही पांढरपाणीला मुक्कामी सगळे जवळपास 2 वाजताच पोहोचलो आणि आम्ही ठरवल की वेळ आहे तर पावनखिंडीत जाऊन आताच दर्शन घेऊ आताच खिंड पाहू, उद्या इतक्या गर्दीत पहायला मिळणार नाही म्हणून आताच जाऊ अस ठरवल! आम्ही आठ किलोमीटर पळत गेलो. त्या कासारी नदीत आम्ही हातपाय धुवून घेतले, मात्र कणादला आंघोळ करायचा मोह आवरला नाही म्हणून त्याने तिथे आंघोळ केली. आणि आम्ही पुन्हा पांढरपाणी मुक्कामी आलो. दुसऱ्या दिवशी गुरुजींनी विशाळगडाच महत्व सांगितलं, पावनखिंडीच महत्व सांगितल आणि दोन मिनिट शांत उभ राहून शिवछत्रपतींना, बाजीप्रभुना, त्या सहाशे मावळ्यांना आठवायला सांगितल. गुरुजींनी पावनखिंडीच महत्व सांगितल्यावर मग मात्र कणाद रडू लागला, की जिथंल पाणी मी तीर्थ म्हणून प्यायला हव होत त्या पाण्यात मी आंघोळ केली याचा त्याला पश्चाताप झाला होता. आम्ही सर्वांनी म्हटलं झाल ते सोडून दे निदान तुला गडकोटांच महत्व समजलं आणि मग मात्र कणादने भावपूर्ण अंतकरणाने मोहीम पूर्ण केली.
गौरव बद्दल सांगायच तर आयुष्यात कधीही एकाही गडावर न गेलेला. आम्ही एकाच मंडळामधले म्हणून दररोज रात्री भेटल्यावर त्याला मोहिमेविषयी सांगायच आणि तो तयारही झाला यायला. मोहिमे वरून परतत असताना त्याने मला सांगितल की मी मोहिमेला खर तर पिकनिक म्हणूनच आलो होतो, परंतु जसा तो माहौल पाहिला जस गुरुजींना पन्हाळगडावर पाहिल त्या क्षणी माझ पिकनिकच भूत उतरल आणि मी खऱ्या अर्थाने मोहिमेत आलो आणि पुढे मला मोहीम समजली.
मोहिमेच्या आधीचे आणि नंतरच हें तिघेे यामधला फरक मी पाहिला आहे. मोहिमेत यांचा पुनर्जन्म झालेला मी पाहिल. तिघेही कडवे देशभक्त झाले. अशी ही मोहीम कित्तेकांना घडवते, अनेकांचा पुनर्जन्म होतो. अशा मोहिमेत आपणही सामील व्हाव !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा