. हिंदूंनों, नाताळ साजरा करण्याआधी हे नक्की वाचा !

. हिंदूंनों, नाताळ साजरा करण्याआधी हे नक्की वाचा !
.
इंग्रजी शाळा आणि ख्रिस्ती धर्माचा प्रसार
संग्रहात असलेली शिवकालीन पत्रे वाचत होतो आणि हे पत्र वाचनात आले....
मुंबईकर इंग्रज सूरतच्या अधिकाऱ्यांना कळवीत आहेत...
"आम्ही येथील (हिंदू) लोकांच्या मुलांना इंग्रजी शिकविण्याकरिता एक दोन शाळामास्तर ठेवावे अशी बेटावरील (आपल्या) लोकांकडून मागणी आली आहे. परस्परांत स्नेह वाढावयास व ' ख्रिस्ती धर्माचा प्रसार होण्यास ' या योगे उत्तम आरंभ होणार आहे.'
या कामी या ख्रिस्ती लोकांना (इंग्रजांना) मोगल सरदार मदत करायचे.
हे पत्र म्हणजे आपल्याला एक चपराकच आहे. आज हिंदुस्थानात जे काही 'Convent , English High School' चे स्तोम माजले आहे त्यामागील या ख्रिस्ती धर्मीयांची मुळ भावना ही 'ख्रिस्ती धर्म प्रसार' हीच आहे हे या शिवकालीन १६६८ च्या पत्रावरुन स्पष्ट होतं.
आज आपण आपली मुलं इंग्रजी शाळेत घालतो याच कारण '२१ व्या शतकात इंग्रजी येणे किती गरजेचे आहे' असं आम्हाला वाटत . पण खरं तर हां भ्रम आहे जो आपल्या समोर उभा केला जात आहे .
आपल्या मुलांना इंग्रजी शिकवा पण त्याच बरोबर शिवछत्रपतींचा 'हिंदुधर्माभिमान' आणि 'मराठी बाणा' सुध्दा त्यांच्या मनात बिंबवा , हीच काळाची गरज आहे. आज अनेक हिंदू लोकं काहीही संबंध नसताना ख्रिस्तींच्य नाताळाच्य शुभेच्छा देत आहेत त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची अत्यंत गरज आहे !
शिवकालापासून ते आजतागायत या ख्रिस्ती लोकांची मानसिकता काय होती, हे तुम्हांसर्वांच्या समोर आणणे हे मी माझं शिवकार्य समजतो.
आपला
बळवंतराव दळवी
शिवचरित्र आणि सह्याद्री whtsp समुह

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"HINDAVI SWARAJYA SUVARN SINHASAN PUNARSANSTHAPANA NYAS"

nageshwar mandir satara

karla leni