आनंद क्षितिजापलीकडचा !

https://www.facebook.com/photo.php?fbid=400597800375009&set=a.135114793589979.1073741828.100012743778811&type=3&theater

. आनंद क्षितिजापलीकडचा !

हे असं एकदा तरी मुंबईतील धारकऱ्यांसोबत घडावं हे मी माझ्या पहिल्या मोहिमेपासून ठरवलं होतं ! मोहिमेतील हे असे गुरुजींसोबतच क्षण आपल्यालाही मिळावेत ही फार दिवसांची इच्छा ! मुंबईतील धारकऱ्यांना काही सूचना दिल्या होत्याच अन गुरुजींना मुंबईतील धारकऱ्यांकडे घेउन आलो. सांगितल्याप्रमाणे मुंबईतील धारकऱ्यांचा गराडा गुरुजींभोवती पडला. गुरुजी सर्व मुंबईकरांसोबत निवांतपणे बोलले.
" मुंबईतील आपले कार्य असे वाढवा की बारामती हादरली पाहिजे !"
गुरुजींसकट मुंबईकरही दिलखुलास हसले !

मोहिमेत चार पावलं गुरुजींसोबत मुंबईतील धारकऱ्यांनी चालावेत ही इच्छा सुध्दा याचवेळी श्री पन्हाळगड ते श्री विशाळगड मोहिमेत पुर्ण झाली.

आणि एक इच्छा ती म्हणजे आदरणीय गुरुजींसोबत मोहिमेत एखाद भाकर तुकडा खायला मिळावा हीही इच्छा शिवछत्रपतींनी मागिल मोहिमेत पुर्ण केली. महाप्रसादाच्या ठिकाणी रस्त्यावर गुरुजींच्या शेजारी बसलो होतो. गुरुजींनी मला धारकऱ्यांकरिता एक महत्वाची सुचना देण्यासाठी सांगितले.
'बळवंतराव, विशाळगडावर आपल्या धारकऱ्यांनी एकही रुपयाची वस्तू त्या हिरव्या पिलावळींकडून विकत घ्यायची नाही !'

अन काही वेळातच तिथ अध्यक्ष रावसाहेब देसाई आणि नितिनदादा चौगुले आले. गुरुजींना महाप्रसाद घेउयात म्हणून सांगितले. नितीनदादांनी माझा हात धरला आणि सोबत घेउन निघाले. गुरुजींच्या मागे एक एक करत आम्ही साऱ्यांनी आपली ताटे घेत त्यात महाप्रसाद घेतला सोबत गोड लापसी ( खीर ) होती. आकाश ठेंगणे व्हावे असा क्षण माझ्या आयुष्यात आला तो म्हणजे अगदी गुरुजींच्या शेजारी बसून मोहिमेतील महाप्रसादाचा मला लाभ घेता आला.

देवाकडे जे मागितले होते ते देताना माझी झोळी फाटेल इतकं तो माझ्या पदरात घालत होता. आयुष्यभर लक्षात राहिल असे ते सुवर्ण क्षण !

काही वेळातच तिथ मुंबईतील काही धारकरी ताटं घेउन पुढे जाताना दिसले. मी शंतनूराव लब्देना हाक मारली. खुणेनच त्यांना शेजारी बसायला सांगितले. त्यांच्या सोबत संदिपराव मोहिते आणि काही धारकरी होते. मी उठलो आणि माझी जागा त्यांना दिली. ! मुंबईतील धारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता.... माझा आनंद क्षितिजापलीकडे पोहचला होता !

- बळवंतराव दळवी

#वेध_मोहिमेचे

यंदाची मोहिम २०१८
श्री प्रतापगड ते श्री रायरेश्वर
जावळी अरण्यामार्गे
.

फोटो सौजन्य - Rudra Pawar P
 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

karla leni

nageshwar mandir satara

"HINDAVI SWARAJYA SUVARN SINHASAN PUNARSANSTHAPANA NYAS"