#होय_मी_चाललोय_मोहिमेला

शिवशंभुंचे अस्तित्व ज्या गडांवर होते त्या गडांचे म्हणजेच शिवशंभुंचे दर्शन घ्यायला ....
जिथे सकाळी ५ वाजता दवाने भिजलेली चादर गजराशिवाय शिकवते उठायला .....
जिथे पहाटेला महाजन गुरुजींचे 'उठा उठा सकळीक' आणि 'हे शिवसुंदर समरशालिनी महाराष्ट्र माउली' या गीतांचा गोडवा मिळतो ऐकायला ..... 
जिथे सकाळी सकाळी कडाक्याच्या थंडीत उघड्या अंगाने बैठका आणि सुर्यनमस्कार मारणारे वाघ दिसतील बघायला .......
मिलिंददादा तानवडेंच्या भारदस्त आवाजातील कवी भुषण छंद डोक्यात साठवुन ठेवायला....
जिथे बलकवडे, चिंचोलकर, विश्वास पाटील, आफळेबुवा ईत्यादी कित्येक व्याख्यात्यांच्या वाणीतुन बाहेर पडणारा ईतिहास समजुन घ्यायला.....
पाच दिवसांचे ओझे पाठीवर घेउन दऱ्या खोऱ्यात मावळ्यांप्रमाणे जगणे अनुभवायला ....
वीररसात कडाडणारी हलगी आणि त्या हलगीच्या नादातुन प्रेरित होऊन पुढच्या मुक्कामास सपासप निघणारे तरुण पहायला.....
शिवप्रभु दौडीत सहभागी होऊन भगव्या झेंड्याच्या मानासाठी हृदयाचे ठोके वाजवीत पळणारे वीर पहायला....
त्याग, शारिरिक व मानसिक श्रम, संयम, चिकाटी आपल्यात किती आहे हे तोलायला....
मावळ्यांच्या घामाने आणि रक्ताने पवित्र झालेली माती भाळी लावायला......
आणि शेवटी ... ज्या माउलींची वर्षभर चातकाप्रमाणे वाट पाहतो त्या गुरुजींचे दर्शन घ्यायला ......
मग काय करताय? येताय ना मोहिमेला……
श्री प्रतापगड ते श्री रायरेश्वर
दिनांक २६ जानेवारी ते ३० जानेवारी
मंगेश केणी
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान - मुंबई.








https://www.facebook.com/photo.php?fbid=1501710719883561&set=pcb.1501710736550226&type=3&theater

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

nageshwar mandir satara

karla leni

"HINDAVI SWARAJYA SUVARN SINHASAN PUNARSANSTHAPANA NYAS"